पाळीव प्राण्यांना रेल्वेतून नेण्यास मनाई :  कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 01:05 AM2020-03-20T01:05:41+5:302020-03-20T01:07:19+5:30

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनाने पाळीव प्राण्यांना रेल्वेतून नेण्यास मनाई केली आहे. या बाबतचा आदेश मध्य रेल्वेच्या मुंबई मुख्यालयातील वाणिज्य कार्यालयाने नागपूर, मुंबई, भुसावळ, सोलापूर आणि पुणे विभागांना गुरुवारी पाठविला आहे.

No pets to be taken off the train: decision to stop Corona outbreak | पाळीव प्राण्यांना रेल्वेतून नेण्यास मनाई :  कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी निर्णय

पाळीव प्राण्यांना रेल्वेतून नेण्यास मनाई :  कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी निर्णय

Next
ठळक मुद्देमध्य रेल्वेचे विभागीय कार्यालयांना आदेश

 लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनाने पाळीव प्राण्यांना रेल्वेतून नेण्यास मनाई केली आहे. या बाबतचा आदेश मध्य रेल्वेच्या मुंबई मुख्यालयातील वाणिज्य कार्यालयाने नागपूर, मुंबई, भुसावळ, सोलापूर आणि पुणे विभागांना गुरुवारी पाठविला आहे.
मध्य रेल्वेच्या मुंबई मुख्यालयाने नागपूर विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयाला पाठविलेल्या आदेशात पाळीव प्राण्यांना प्रवासी रेल्वेगाड्यांतून डॉग बॉक्समध्ये ठेवून नेण्यास ३१ मार्चपर्यंत मनाई करण्यात आल्याचे म्हटले आहे. श्वान, मांजर अशा पाळीव प्राण्यांना नागरिक घरी सोडून जात नाहीत. इतर शहरांमध्ये जाण्याची वेळ आल्यानंतर नागरिक आपल्या घरातील पाळीव प्राण्यांनाही सोबत घेऊन जातात. रेल्वेने प्रवास करावयाचा असल्यास या पाळीव प्राण्यांची बुकिंग पार्सल कार्यालयात करावी लागते. त्यासाठी ठराविक शुल्क संबंधित प्रवाशाला द्यावे लागते. त्यानंतर पार्सल व्हॅनमध्ये तयार करण्यात आलेल्या डॉग केज (पिंजऱ्यात) या पाळीव प्राण्यांना ठेवण्यात येते. तर या पाळीव प्राण्यांचे मालक रेल्वेगाडीच्या इतर कोचमध्ये प्रवास करतात. एसी फर्स्टच्या स्वतंत्र कंपार्टमेंटमध्ये प्रवासी या पाळीव प्राण्यांना आपल्या सोबत नेऊ शकतात. परंतु रेल्वे प्रशासनाने ३१ मार्चपर्यंत पाळीव प्राण्यांना रेल्वेने नेण्यास मनाई केल्यामुळे या पाळीव प्राण्यांना रेल्वेने नेता येणार नाही.

Web Title: No pets to be taken off the train: decision to stop Corona outbreak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.