एकही व्हेंटिलेटर उपलब्ध नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:07 AM2021-04-14T04:07:50+5:302021-04-14T04:07:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोविड संक्रमणामुळे शहरातील आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे. शासकीयसोबतच खासगी रुग्णालये फुल्ल झाली आहेत. मंगळवारी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोविड संक्रमणामुळे शहरातील आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे. शासकीयसोबतच खासगी रुग्णालये फुल्ल झाली आहेत. मंगळवारी सायंकाळी एकही व्हेंटिलटर उपलब्ध नव्हते. ऑक्सिजनचे ३३, तर फक्त २ आयसीयू उपलब्ध असल्याने सामान्य रुग्णांना ऑक्सिजन लावण्याची सुविधा उपलब्ध करणे अवघड झाले आहे.
कोविड रुग्णांसाठी नागपूर शहरात जवळपास सहा हजार बेड मनपा प्रशासनाने शासकीय नियमानुसार आरक्षित केले आहे, तर खासगी रुग्णालये २० टक्के बेडचे शुल्क आपल्या स्तरावर वसूल करू शकतात. गरीब रुग्णांची अवस्था फारच बिकट झाली आहे. दुसरीकडे खर्च करण्याची तयारी असणारे बेड उपलब्ध नसल्याने हतबल झाले आहेत. मनपा प्रशासनाने मंगळवारी सायंकाळी केलेल्या दाव्यानुसार नागपुरात ऑक्सिजनचे ३३, आयसीयूचे २ उपलब्ध असून, व्हेंटिलेटरचा एकही बेड खाली नसल्याने शहरातील स्थिती गंभीर बनली आहे.