मनपा मुख्यालय परिसरात थुंकणाऱ्या १२ कर्मचाऱ्यांना निलंबनाची नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 08:55 PM2019-10-15T20:55:10+5:302019-10-15T20:56:10+5:30

सिव्हील लाईन्स येथील महापालिका मुख्यालय परिसरातही उपद्रव शोध पथक थुंकणाऱ्यांवर कारवाई करत आहे. परिसर घाण करण्याच्या प्रकाराची आयुक्त अभिजित बांगर यांनी गंभीर दखल घेत १२ कर्मचाऱ्यांना शिस्तभंगाची कारवाई करून निलंबन कारवाई का करू नये, याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

Notice of suspension for 12 spitting staff at NMC Headquarters area | मनपा मुख्यालय परिसरात थुंकणाऱ्या १२ कर्मचाऱ्यांना निलंबनाची नोटीस

मनपा मुख्यालय परिसरात थुंकणाऱ्या १२ कर्मचाऱ्यांना निलंबनाची नोटीस

Next
ठळक मुद्देघाण केल्याची आयुक्तांनी घेतली गंभीर दखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात सर्वत्र स्वच्छता राहावी, सार्वजनिक ठिकाणी घाण होऊ नये यासाठी महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे शहरातील विविध भागांमध्ये नजर ठेवली जात आहे. सार्वजनिक ठिकाणी घाण करून शहर विद्रुप करणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. शहरातच नव्हे तर सिव्हील लाईन्स येथील महापालिका मुख्यालय परिसरातही उपद्रव शोध पथक थुंकणाऱ्यांवर कारवाई करत आहे. परिसर घाण करण्याच्या प्रकाराची आयुक्त अभिजित बांगर यांनी गंभीर दखल घेत १२ कर्मचाऱ्यांना शिस्तभंगाची कारवाई करून निलंबन कारवाई का करू नये, याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
यात सामान्य प्रशासन विभागातील कर्मचारी वाहन चालक शेखर शंखदरबार, शिक्षण विभागातील सहायक अधीक्षक अनिल कराडे, स्थानिक संस्था कर विभागाचे समिती विभागात कार्यरत मोहरीर भूपेंद्र तिवारी, कर संग्राहक सुनील मोहोड,कर आकारणी विभागातील वित्त विभागातील ज्येष्ठ श्रेणी लिपीक प्रमोद कोल्हे, आरोग्य विभागाचे मागासवर्ग कक्षात कार्यरत सफाई मजदूर अविनाश बन्सोड, आरोग्य विभागातील जमादार स्वप्निल मोटघरे, एस.आर.ए. विभागातील चपराशी भगवानदिन पटेल, स्थानिक संस्था कर विभागाचे मोहरीर विकास गावंडे, अग्निशमन विभागातील हॅड्रन्ट कुली रवींद्र सतभैया, सामान्य प्रशासन विभागातील शैलेश ढगे, कर व कर आकारणी विभागातील कनिष्ठ निरीक्षक प्रमोद मोगरे आदींचा समावेश आहे. या सर्वांंना आयुक्तांनी शिस्तभंगाची कारवाई करीत निलंबनाची नोटीस बजावली आहे.
शहर विद्रुप करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेने उपद्रव शोध पथक गठित केले आहे. झोन स्तरावर पथकाची नेमणूक करण्यात आली असून पथकामध्ये ८७ जणांचा समावेश आहे. ११ सप्टेंबर ते ९ ऑक्टोबर या कालावधीमध्ये मनपा. मुख्यालयात एकू ण १०५ नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी थुंकणे व उघड्यावर लघवी करण्यासाठी दंड आकारण्यात आला आहे. यामध्ये उघड्यावर लघवी करणाऱ्या १५ प्रकरणात ३००० रुपये, ९० प्रकरणात ९००० रुपये दंड याप्रमाणे १०५ प्रकरणात एकूण १२ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. कारवाई करण्यात आलेल्या १०५ जणांमध्ये मनपाच्या विविध विभागात कार्यरत १२ अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

घाण केल्यास कारवाई होणार
आपले घर, परिसर व शहर स्वच्छ ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. याशिवाय आपण जिथे काम करतो त्या कार्यालयाचा परिसर स्वच्छ ठेवण्याची सुद्धा आपली जबाबदारी आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी कुठेही घाण करु नये. घाण करुन आपला परिसर, शहर विद्रुप केल्याचे निदर्शनास आल्यास उपद्रव शोध पथकाद्वारे कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्तांनी दिला आहे .

Web Title: Notice of suspension for 12 spitting staff at NMC Headquarters area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.