नागपूर मनोरुग्णांवर आता ५८ सीसीटीव्हींचा वॉच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 11:40 PM2018-06-12T23:40:19+5:302018-06-12T23:40:30+5:30

प्रादेशिक मनोरुग्णालयातील रुग्णांच्या सुरक्षेसोबतच त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आता ५८ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. ३२ लाख रुपये खर्चून लावण्यात आलेल्या या कॅमेऱ्यांमुळे रुग्ण पळून जाण्याच्या घटनेला काही प्रमाणात प्रतिबंध बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Now 58 CCT Watch at Nagpur mental patient | नागपूर मनोरुग्णांवर आता ५८ सीसीटीव्हींचा वॉच

नागपूर मनोरुग्णांवर आता ५८ सीसीटीव्हींचा वॉच

Next
ठळक मुद्देप्रादेशिक मनोरुग्णालय : रुग्ण पळून जाण्याच्या घटनांना लागणार प्रतिबंध!

लोकमत न्यूज नेटवर्क   
नागपूर : प्रादेशिक मनोरुग्णालयातील रुग्णांच्या सुरक्षेसोबतच त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आता ५८ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. ३२ लाख रुपये खर्चून लावण्यात आलेल्या या कॅमे ऱ्यांमुळे रुग्ण पळून जाण्याच्या घटनेला काही प्रमाणात प्रतिबंध बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
प्रादेशिक मनोरुग्णालय हे ५४ एकर परिसरात पसरलेले आहे. यातील १० एकर जागेत महिला विभाग आहे. गेल्या वर्षी मनोरुग्णालयात १०९ रुग्णांचा मृत्यू झाला तर शंभरावर रुग्ण पळून गेले. शिवाय रुग्णांशी गैरवर्तणूक, कर्मचाऱ्यांचा जुगाराचा खेळ, गळा दाबून हत्येचे प्रकरण, अत्याचाराचे प्रकरण आदीला गंभीरतेने घेत सार्वजनिक आरोग्य विभागाने रुग्णालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी ३१ लाख ९८ हजार ८८८ इतक्या खर्चास मंजुरी दिली. पूर्वी मनोरुग्णालयात केवळ सहा सीसीटीव्ही कॅमेरे होते. हे कॅमेरे पुरुषांचा वॉर्ड क्र. ८, महिलांचा वॉर्ड क्र. २० व दोन्ही अतिदक्षता विभाग व व्हरांड्यात लावण्यात आले होते. परंतु मोठा परिसर व कॅमेºयांची संख्या अत्यल्प असल्याने रुग्णालय प्रशासनाने वाढीव सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. १७ जुलै २०१७ रोजी प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता मिळाली. तब्बल वर्षभरानंतर रुग्णालयाच्या एकूण १६ वॉर्डांसह बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी), रुग्णालयाचा आतील व बाहेरील परिसर आदी ठिकाणी एकूण ५८ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे काम पूर्ण झाले. रुग्णालयाच्या सभोवतालची १४ फुटांची भिंत व आता कॅमेरे लागल्याने रुग्णांना पळून जाताच येणार नाही, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. याशिवाय रुग्णांसोबत कर्मचा ऱ्यांच्या हालचालींवर कॅमे ऱ्यांद्वारे नजर ठेवली जाणार असल्यामुळे अनुचित प्रकार व घटनांना आळा बसण्याची शक्यता आहे.
७१२ जणांना स्वाईन फ्लूची लस
रुग्ण व रुग्णालयातील अधिकारी व कर्मचा ऱ्यांना स्वाईन फ्लूची लागण होऊ नये म्हणून प्रशासनातर्फे ५५० रुग्णांना व उर्वरित अधिकारी, कर्मचारी व सफाई कामगारांना ‘स्वाईन फ्लू’ प्रतिबंधक लस देण्यात आली, अशी माहिती रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रवीण नवखरे यांनी दिली.
औषधांसाठी मिळाले सात लाख
सर्व शासकीय रुग्णालयांना औषधांचा पुरवठा हाफकीन कंपनीकडून होणार असला तरी त्यांच्याकडून होणारा विलंब लक्षात घेऊन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सहसंचालक डॉ. साधना तायडे यांनी नुकतेच सात लाख रुपये उपलब्ध करून दिल्याने काही प्रमाणात औषधांची समस्या निकाली निघाली आहे.

Web Title: Now 58 CCT Watch at Nagpur mental patient

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.