अब की बार विदर्भ की सरकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 08:58 PM2018-04-16T20:58:29+5:302018-04-16T21:02:37+5:30
भाजपाने विदर्भाच्या माणसांना वचन दिले होते; पण त्यांनी वैदर्भीय जनतेचा विश्वासघात केला आहे. भाजपाला आता पळवून लावले पाहिजे. साम, दाम, दंड, भेदाचा वापर करून कोणत्याही परिस्थितीत भाजपाला विदर्भातून हद्दपार केले पाहिजे, यावर विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या दुसऱ्या राष्ट्रीय अधिवेशनतील विदर्भ संसद या विषयावर आयोजित परिसंवादात सर्वांचे एकमत झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भाजपाने विदर्भाच्या माणसांना वचन दिले होते; पण त्यांनी वैदर्भीय जनतेचा विश्वासघात केला आहे. भाजपाला आता पळवून लावले पाहिजे. साम, दाम, दंड, भेदाचा वापर करून कोणत्याही परिस्थितीत भाजपाला विदर्भातून हद्दपार केले पाहिजे, यावर विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या दुसऱ्या राष्ट्रीय अधिवेशनतील विदर्भ संसद या विषयावर आयोजित परिसंवादात सर्वांचे एकमत झाले.
अध्यक्षस्थानी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कोअर कमिटीचे सदस्य अॅड. गोविंद भेंडारकर होते. राष्ट्रीय जनसुराज्य पार्टीचे अध्यक्ष राजेश काकडे, व्ही कनेक्टचे अॅड. मुकेश समर्थ, विदर्भ माझाचे राजकुमार तिरपुडे, चंद्र्रपूरच्या यल्गार संस्थेच्या पारोमिता गोस्वामी, अंजली कुळकर्णी, जनमंचचे अध्यक्ष प्रा. शरद पाटील, विदर्भ जागरणचे नितीन रोंघे, चंद्र्रपूरचे अॅड. मिर्झा फरहत बेग, विदर्भ राज्य आघाडीचे कार्याध्यक्ष अॅड. नीरज खांदेवाले, विदर्भ राज्य आंदोलन समितीचे प्रबीर चक्रवर्ती, बीआरएसपीचे डॉ. रमेश जनबंधू, कोकणातून आलेले भाऊ पानसरे, दिल्लीहून आलेले राष्ट्रीय प्राऊटिस्ट ब्लॉकचे संतोषानंद महाराज यांनी परिसंवादात सहभाग नोंदवला.
प्रास्ताविक राजकुमार नागुलवार यांनी केले.
संचालन विजया धोटे यांनी केले.
१ मे रोजी ग्रामसभांमध्ये ठराव
विदर्भ राज्य दिले नाही तर सत्तेमधील १० खासदार आणि ६० आमदार भाजपाला गमवावे लागतील. लोकसभेत प्रतिनिधी बोलत नसतील तर आपल्याला आता विदर्भाच्या सर्व ग्रामसभांमध्ये वेगळ्या विदर्भाचा ठराव करावा लागणार आहे. हा ठराव १ मे रोजी केला जाणार आहे, असे अॅड. नीरज खांदेवाले म्हणाले.
राष्ट्रवादीचे समर्थन
आम्हालाही वेगळा विदर्भ पाहिजे, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अनिल अहेरकर यांनी विदर्भाच्या आंदोलनाला समर्थन जाहीर केले. यावेळी पक्षाचे नेते राजू नागुलवार उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पाठीशी असून आम्ही सर्व नेते भरघोसपणे सहाय्य करू, असे ते म्हणाले.