लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यभरातील शासकीय परिचारिकांच्या मागण्यांसाठी शासनदरबारी वेळोवेळी चर्चा होऊनही दुर्लक्ष केले जात आहे. शासन दखल घ्यायला तयार नसल्याने विदभार्तील साडेसात हजार परिचारिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. लवकरच आंदोलनाची तारीख सांगितली जाईल, असे विदर्भ नर्सेस असोसिएशनने कळविले आहे.२०१५ पूर्वीच्या परिचारिकांना शासनाकडून बंधपत्रिकेच्या मागणीनुसार सेवेत घेतले जात नाही, शासनाचे नियमानुसार तीन वर्षात बदली धोरण असताना परिचारिकांची कधी दीड ते दोन वर्षात, तर कधीही कुठल्याही कारणांवरून बदली करण्यात येते. याला ‘महाराष्ट्र गव्हर्नमेंट विदर्भ नर्सेस असोसिएशन’चा विरोध आहे. बदली शहराबाहेर नको आणि स्वेच्छा बदली हवी, तसेच समान काम समान वेतन यानुसार प्रत्येकाला सारखे वेतन असावे, यासह इतर मागण्यांची पूर्तता करावी, अशी मागणी शासनाकडे परिचारिका संघटनेने केली आहे. मात्र, शासनाकडून नेहमीच दुर्लक्ष केले जाते. राज्य शासनाने वेतन भत्त्यासंदर्भात मागील चौथ्या वेतन आयोगापासून केंद्राचे धोरण स्वीकारले आहे. राज्य शासन त्या धोरणांची अंमलबजावणी करीत नसल्यामुळे केंद्रातील परिचारिका आणि राज्यातील शासकीय रुग्णालय व महाविद्यालयातील परिचारिकांमध्ये वेतन, भत्ते, सेवा यामध्ये तफावत आहे. त्यामुळे रुग्णसेवा हा केंद्रबिंदू मानणाऱ्या पुरोगामी महाराष्ट्रात अशाप्रकारची दुटप्पी भूमिका व तफावत मागील अनेक वर्षांपासून परिचारिकांना सहन करावी लागत आहे. राज्य शासनाने मागण्यांची पूर्तता न केल्यास बेमुदत काम बंद आंदोलन केले जाईल, इशारा विदर्भ नर्सेस असोसिएशनने दिला आहे.
परिचारिकांचा काम बंद आंदोलनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2018 12:30 AM
राज्यभरातील शासकीय परिचारिकांच्या मागण्यांसाठी शासनदरबारी वेळोवेळी चर्चा होऊनही दुर्लक्ष केले जात आहे. शासन दखल घ्यायला तयार नसल्याने विदभार्तील साडेसात हजार परिचारिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. लवकरच आंदोलनाची तारीख सांगितली जाईल, असे विदर्भ नर्सेस असोसिएशनने कळविले आहे.
ठळक मुद्देविदर्भ नर्सेस असोसिएशन : मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा संताप