- घरोघरी कढईचा प्रसाद, पूजन करून भक्तांनी सोडला उपवास
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी घरोघरी भगवान शिव व माता पार्वतीला नैवेद्य अर्पण करण्यात आले. यासोबतच महाशिवरात्रीचा उपवास सोडण्यात आला. सकाळपासूनच घरोघरी पूजन सुरू झाले. भक्तांनी अंगणातच लाकूड आणि आंब्याच्या पानांचे तोरण बांधले होते. त्या खाली शिव व पार्वतीची स्थापना करण्यात आली होती. कलश पूजनासोबतच भगवंताचे पूजन, होम हवन, कढई आदींचे अनुष्ठान करण्यात आले. महादेवाला हलवा प्रसाद चढविण्यात आला. यंदा मात्र कोरोना संक्रमणाच्या स्थितीत अत्यंत साधेपणाने हा कार्यक्रम पार पडला.
विश्व सिंधी सेवा संगमने केला अभिषेक
नागपूर : विश्व सिंधी सेवा संगम, पूर्व नागपूरच्या महिला चमूने वर्धमाननगर येथील शिवमंदिरात महादेवाला अभिषेक घालण्यात आला. यावेळी कोरोनामुक्तीसाठी प्रार्थना करण्यात आली. यावेळी अध्यक्ष अर्चना छाबरिया, संयोजक मिता चावला, उपाध्यक्ष हितिशा मुलतानी, भावना दयानी, कोमल चंदवानी यांनी अभिषेक केला. कंचन चंदवानी, हेमा मोटवानी, पूनम मोटवानी, जुही अनवानी, रितिका भोजवानी, सिमरन दहलानी, भावना बदलनी, रुही मोटवानी, जिया छाबरिया, रिषिका छाबरिया, संगीता कृष्णानी यांनी प्रसाद वितरण केले.
-------------
नारी घाट येथे मूर्तीची स्थापना
नागपूर : महाशिवरात्रीच्या पर्वावर नारी घाट येथे भगवान शंकराची मूर्ती स्थापित करण्यात आली. महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी नगरसेवक मनोज सांगोडे, नगरसेवक दिनेश यादव, भावना लोणारे, सविता सांगोडे, विष्णू तिवारी, टिंकू तिवारी, आशिष गुप्ता उपस्थित होते.
---------
जेसीआय नागपूर मेट्रोतर्फे लाइनमॅनचा सत्कार
नागपूर : जेसीआय नागपूर मेट्रोच्या वतीने लाइनमॅनचा सत्कार करण्यात आला. संस्थेच्या ड्रीम प्रोजेक्टअंतर्गत शिवनगर, गजानन धाम येथे स्ट्रीट लाइटची व्यवस्था बघणाऱ्या लाइनमॅन्सचा सत्कार यावेळी करण्यात आला. यावेळी उषा नांदेडकर, अध्यक्ष लोकेश नांदेडकर, ज्युनिअर चेअरमन मयुरी रहांगडाले, रूपाली वडगुडे उपस्थित होते.
..........