पेंच नदीत बुडून एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:09 AM2021-02-07T04:09:10+5:302021-02-07T04:09:10+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क पारशिवनी : मित्रांसाेबत फिरायला आलेली व्यक्ती पेंच नदीच्या पात्रात अंघाेळ करण्यासाठी उतरली आणि खाेल पाण्यात गेल्याने ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
पारशिवनी : मित्रांसाेबत फिरायला आलेली व्यक्ती पेंच नदीच्या पात्रात अंघाेळ करण्यासाठी उतरली आणि खाेल पाण्यात गेल्याने त्या व्यक्तीचा बुडून मृत्यू झाला. ही घटना पारशिवनी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील डाेरली शिवारात शनिवारी (दि. ६) दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास घडली.
सुरेश गुंडेराव कावळे (३८, रा. चनकापूर, ता. सावनेर) असे मृताचे नाव आहे. ते त्यांच्या तीन मित्रांसाेबत बिनासंगम (ता. कामठी) येथे सकाळी ११ वाजताच्या सुमारास फिरायला गेले हाेते. तिथे ते डाेरली परिसरात फिरायला आले. दरम्यान, सुरेश कावळे व त्यांचे मित्र माेहन मुलदार पेंच नदीच्या पात्रात अंघाेळ करण्यासाठी उरतले. दाेघांनाही पाण्याच्या खाेलीचा अंदाज न आल्याने ते गटांगळ्या खाऊ लागले. हा प्रकार लक्षात येताच शालिक उईके यांनी पाण्यात उडी घेतली आणि त्यांनी माेहनला बाहेर काढले. याच काळात सुरेश आणखी खाेल पाण्यात गेला आणि बुडाला. शालिकने त्यालाही शाेधण्याचा प्रयत्न केला. मात्र, यश आले नाही. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठले. पाेलिसांनी स्थानिक तरुणांच्या मदतीने सुरेशचा पाण्याचा शाेध घेतला असता, त्याचा मृतदेहच आढळून आला. पाेलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पारशिवनी येथील ग्रामीण रुग्णालयात आणला. या प्रकरणी पारशिवनी पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद करून तपास सुरू केला आहे.