एसटीची ऑनलाईन बुकींग अनेकांना ठाऊकच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:10 AM2021-08-26T04:10:14+5:302021-08-26T04:10:14+5:30
ऑनलाईन बुकींगची आकडेवारी वर्ष प्रवाशांची संख्या -२०१८ १४४०० -२०१९ १३३०० ...
ऑनलाईन बुकींगची आकडेवारी
वर्ष प्रवाशांची संख्या
-२०१८ १४४००
-२०१९ १३३००
-२०२० ४०००
-२०२१ (जुलैपर्यंत) ५०००
असे करावे ऑनलाईन बुकींग
-एसटी बसचे ऑनलाईन बुकींग करण्यासाठी ओआरएस डॉट एमएसआरटीसी डॉट कॉम या वेबसाईटवर जाऊन माहिती भरावी लागते. त्यानंतर ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर संबंधीत बसचे ऑनलाईन तिकीट मिळते. या तिकिटाची प्रिंट आऊट काढून ती कंडक्टरला दाखविल्यास तो प्रवासाची परवानगी देतो. तसेच कंडक्टरकडे असलेल्या रिझर्व्हेशन चार्टवर संबंधित प्रवाशाचे नाव येते.
ऑनलाईन बुकींगबाबत माहिती नाही
‘एसटीची ऑनलाईन बुकींग करता येते याबाबत माहितीच नाही. ऑनलाईन बुकींगबाबत एसटी महामंडळाने जनजागृती करण्याची गरज आहे.’
-कैलाश मोरे, प्रवासी
जनजागृतीची गरज
एसटीची ऑनलाईन बुकींग असल्याबाबत एसटी महामंडळाने जनजागृती करण्याची गरज आहे. ऑनलाईन बुकींग केल्यास कन्फर्म तिकीट मिळून बसण्यासाठी सीटची व्यवस्था होते.
-विशाल राठोड, प्रवासी
ऑनलाईन बुकींगची माहिती देऊ
‘एसटी महामंडळाच्या ऑनलाईन बुकींगबाबत प्रवाशांना माहिती देण्यासाठी या सुविधेचा प्रचारप्रसार करण्यात येईल.’
-अनिल आमनेरकर, आगार व्यवस्थापक, गणेशपेठ आगार
...........