लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मनपा शाळांमध्ये प्रामुख्याने मजूर व गरीब कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण घेतात. पहिली ते सातवीपर्यंतच्या बहुसंख्य विद्यार्थ्यांनी स्मार्ट फोन बघितलेला नाही. इयत्ता ८ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांना स्मार्ट फोन हाताळता येतो. पण त्यांच्याकडे हा फोन नाही. काही विद्यार्थ्यांना पालकांनी स्मार्ट फोन उपलब्ध केला तरी इंटरनेटचा खर्च कसा करावा, हा प्रश्न आहे. अशा परिस्थितीत मनपा शाळांताील विद्यार्थ्याना ऑनलाईन शिक्षण देणे हे एक दिवास्वप्नच ठरण्याची शक्यता आहे.लॉकडाऊनच्या काळात काही खासगी शाळांच्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षणावर भर दिला जात आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील महापालिकेच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देता येईल का, याबाबत मनपाने सर्वेक्षण हाती घेतले. शहरातील १३१ प्राथमिक आणि २९ माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण शिक्षकांच्या माध्यमातून सुरू आहे. बहुसंख्य विद्यार्थ्यांकडे स्मार्ट फोन नसल्याचे सर्वेक्षणातून पुढे येत आहे. खासगी शाळा ऑनलाईन शिक्षण देण्याच्या प्रयत्नात आहेत. त्या धर्तीवर मनपा शाळांतील विद्यार्थ्यांना शिक्षण देता येईल का याची चाचपणी सर्वेक्षणातून केली जात आहे.मनपाच्या प्राथमिक शाळांतील इयत्ता १ ली ते ७ वी पर्यंतच्या ७० टक्के विद्यार्थ्यांना स्मार्ट फोन हाताळता येत नाही. ६५ ते ७० टक्के विद्यार्थ्यांच्या पालकांकडे स्मार्ट फोन नाही. निम्म्याहून अधिक विद्यार्थ्यांच्या घरात टीव्ही नाही. अशा परिस्थितीत प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देणे अवघड आहे. इयत्ता ८ वी ते १२ पर्यंत या विद्यार्थ्यांना स्मार्ट फोन हाताळता येतो. मात्र त्यांच्याकडे स्मार्ट फोन नाही. अनेकांच्या कुटुंबातही स्मार्ट फोन नाही. अशा परिस्थितीत ऑनलाईन शिक्षण देणे सोपे नाही.आर्थिक भार उचलला तरच शक्यमनपाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देता येईल का? यावर मंथन सुरू आहे. मात्र मनपा शाळांतील विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती विचारात घेता महापालिकेने मोबाईल व इंटरनेटच्या खर्चाचा भार उचलला तरच ऑनलाईन शिक्षण देणे शक्य होणार आहे. मनपा शाळांतील इयत्ता ८ ते १२ पर्यंतच्या १० हजार विद्यार्थ्यांचा आर्थिक भार उचलावा लागेल.मनपाने निधी उपलब्ध करावामनपा शाळांतील सरसकट सर्व विद्यार्थ्यांनाऑनलाईन शिक्षण देणे सोपे नाही. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती व साधनांचा अभाव विचारात घेता ऑनलाईन शिक्षण देणे अवघड आहे. मात्र काळाची गरज लक्षात घेता ८ ते १२ पर्यंतच्या १० हजार विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी मनपाने निधी उपलब्ध करावा. गरज भासल्यास सेवाभावी संस्थांची मदत घ्यावी.राजेश गवरे, अध्यक्ष, मनपा शिक्षक संघटना
मनपा विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण दिवास्वप्नच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 1:01 AM
मनपा शाळांमध्ये प्रामुख्याने मजूर व गरीब कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण घेतात. पहिली ते सातवीपर्यंतच्या बहुसंख्य विद्यार्थ्यांनी स्मार्ट फोन बघितलेला नाही. इयत्ता ८ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांना स्मार्ट फोन हाताळता येतो. पण त्यांच्याकडे हा फोन नाही. काही विद्यार्थ्यांना पालकांनी स्मार्ट फोन उपलब्ध केला तरी इंटरनेटचा खर्च कसा करावा, हा प्रश्न आहे. अशा परिस्थितीत मनपा शाळांताील विद्यार्थ्याना ऑनलाईन शिक्षण देणे हे एक दिवास्वप्नच ठरण्याची शक्यता आहे.
ठळक मुद्देबहुसंख्य विद्यार्थी स्मार्ट फोन हाताळत नाहीत : मनपाने आर्थिक भार उचलला तरच शक्य