लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : १ एप्रिल हा दिवस जगभरात ‘एप्रिल फूल डे’ म्हणून साजरा केला जातो आणि त्याअनुषंगाने प्रत्येक जण आपापल्या तºहेने सहकार्यांना मुर्ख बनविण्याचा प्रयत्न करत असतो. ही परंपरा शेकडो वर्षापासून सुरू आहे. मात्र, कोरोना विषाणूच्या प्रकोपामुळे या मुर्खदिनी कुठल्याही अफवा पसरू नये किंवा मुर्ख बनविण्याच्या नादात समाजात तणावाची परिस्थती निर्माण होऊ नये म्हणून राज्याच्या गृहमंत्र्यांनी तशी काळजी घेण्याचे आवाहन केले. त्याच आवाहनाचा धसका हजारो, लाखो व्हॉट्सअप ग्रुपच्या अॅडमिन्सने घेतला आहे. संध्याकाळपासूच ‘ओन्ली फॉर ग्रुप अॅडिमिन’ अशी सेटींग बदलवली जात असल्याचे चित्र आहे.वेगवेगळ्या व्हॉट्सअप ग्रुप आणि फेसबुक, इन्स्टा, टष्ट्वीटरवर कुठल्याही प्रकारचे धक्कादायक विनोद पसरू नये आणि त्याअनुषंगाने समाजात तणावाची स्थिती निर्माण होऊ नये म्हणून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सख्त ताकीद दिली आहे आणि अशा ग्रुपच्या अॅडमिन्सवर कठोर कारवाई करण्याचे फर्मान सोडले आहे. त्याचा धसका हजारो, लाखो ग्रुप अॅडमिन्सने घेतला आहे. संध्याकाळपासूनच प्रत्येक ग्रुपवर मित्र मंडळी आपल्या अॅडमिन्सला सजग करत असल्याचे चित्र आहे. अनेकांनी आपले ग्रुप लॉक केले असून, कुणालाही कुठलाही मॅसेज टाकता येऊ नये म्हणून सेटींगमध्ये जाऊन ‘ओन्ली फॉर ग्रुप अॅडमिन’ करण्यात आले आहे.