काेविड सेंटरमधील जैविक कचरा उघड्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:07 AM2021-06-28T04:07:17+5:302021-06-28T04:07:17+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क भिवापूर : स्थानिक कोविड सेंटरमधील जैविक कचरा (मेडिकल वेस्ट) केंद्राच्या आवारात उघड्यावर टाकला आहे. हा कचरा ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
भिवापूर : स्थानिक कोविड सेंटरमधील जैविक कचरा (मेडिकल वेस्ट) केंद्राच्या आवारात उघड्यावर टाकला आहे. हा कचरा काेराेना संक्रमणाच्या पथ्थावर पडण्याची शक्यता असल्याने नागरिकात संताप व्यक्त हाेत हाेता. ही बाब लक्षात येताच आराेग्य विभागाने या कचऱ्याची विल्हेवाट लावली.
स्थानिक भिवापूर एज्युकेशन सोसायटी शाळेच्या इमारतीत कोविड तपासणी केंद्र सुरू आहे. याठिकाणी दररोज रुग्णांची कोविड चाचणी केली जाते. कोविड सेंटरबाहेर नगर पंचायतने कचराकुंडी लावल्या आहेत. या कचराकुंडी समाेर पीपीई किट व रुग्ण तपासणीसाठी वापरले जाणारे साहित्य उघड्यावर टाकले असल्याचे काही तरुणांना दिसून आले. याबाबत ग्रामीण रुग्णालय प्रशासनाला कळविले. या दुर्लक्षित प्रकारामुळे स्थानिकांचे आरोग्य धोक्यात येत असल्याचा आरोप करीत नागरिकांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर हा कचरा उचलण्यात आला. काेराेनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता असतानाच रुग्णांवर वापरलेले साहित्य उघड्यावर फेकणे कितपत योग्य, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.