आॅनलाईन ट्रॅव्हल्स एजन्सींचा विरोध करणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 12:34 AM2018-12-08T00:34:14+5:302018-12-08T00:35:32+5:30

नागपूर रेसिडेन्शियल हॉटेल्स असोसिएशनने (एनआरएचए) एका बैठकीत आॅनलाईन ट्रॅव्हल्स एजन्सींच्या (ओटीए) मनमानी कारभाराविरुद्ध राष्ट्रवादी विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे.

Oppose the online travel agency | आॅनलाईन ट्रॅव्हल्स एजन्सींचा विरोध करणार 

आॅनलाईन ट्रॅव्हल्स एजन्सींचा विरोध करणार 

googlenewsNext
ठळक मुद्दे ‘एमआरएचए’चा बैठकीत निर्णय : ‘ओटीए’चा मनमानी कारभार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर रेसिडेन्शियल हॉटेल्स असोसिएशनने (एनआरएचए) एका बैठकीत आॅनलाईन ट्रॅव्हल्स एजन्सींच्या (ओटीए) मनमानी कारभाराविरुद्ध राष्ट्रवादी विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे.
बैठक असोसिएशनचे अध्यक्ष तेजिंदर सिंग रेणू यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. आॅनलाईन पोर्टल कंपन्यांनी हॉटेलसोबत केलेल्या कराराविरुद्ध जास्त कमिशनची मागणी करणे, पोर्टलद्वारे आपल्या प्लॅटफॉर्मवर हॉटेलच्या सहमतीविना नोंदणी मूल्यापेक्षा जास्त सूट देणे, अवैध होस्टिंग व परवान्याविना बेड उपलब्ध करून देण्यामुळे काही हॉटेल व्यावसायिक आणि आॅनलाईन पोर्टल कंपन्यांमध्ये वाद निर्माण होत असण्यावर चर्चा झाली. काही सदस्यांनी ओटीएकडून येणाऱ्या अडचणींची माहिती दिली.
बैठकीनंतर रेणू यांनी समस्यांवर वेस्टर्न इंडिया, मुंबईचे (एचआरए-डब्ल्यूआय) अध्यक्ष गुरुबक्षीस सिंह कोहली यांच्याशी चर्चा केली. कोहली म्हणाले, संघटनेकडे देशाच्या अन्य शहरांतून तक्रारी आल्या आहेत. नवी दिल्ली येथील फेडरेशन आॅफ हॉटेल अ‍ॅण्ड रेस्टॉरंट असोसिएशन आॅफ इंडियाने काही आॅनलाईन पोर्टलला पत्र पाठवून समस्या सोडविण्याचे आवाहन करताना पोर्टलविरुद्ध राष्ट्रवादी विरोध करण्याचा इशारा दिला आहे.
बैठकीत एनआरएचएचे माजी अध्यक्ष प्रकाश त्रिवेदी, उपाध्यक्ष इंदरजित सिंग बावेजा, सचिव दीपक खुराणा, कोषाध्यक्ष विनोद जोशी, सदस्य शिवम गुप्ता, राजन मुलानी, अजय जयस्वाल, पुनित दरगान, सुधीर जयस्वाल, गुरबचन सिंग कंवल, मोहन त्रिवेदी, राजेश धार्मिक, विजय सावरकर, शरद पाराशर, वासुदेव त्रिवेदी, महेश त्रिवेदी, विशाल जयस्वाल, विनोद चौरसिया, सुद्दू वैद्य, मनोज शुक्ला आणि अमित रघटाटे प्रामुख्याने उपस्थित होते.

Web Title: Oppose the online travel agency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.