घेतले खोके भूखंड ओके; हातात श्रीखंडाचे डबे घेऊन विरोधकांनी आवळला सूर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 11:24 AM2022-12-22T11:24:44+5:302022-12-22T11:26:42+5:30

खोके.. खोके.. च्या नाऱ्यांनी विधान भवन परिसर दणाणला

opposition leaders agitated against rulling party amid corruption and scam | घेतले खोके भूखंड ओके; हातात श्रीखंडाचे डबे घेऊन विरोधकांनी आवळला सूर

घेतले खोके भूखंड ओके; हातात श्रीखंडाचे डबे घेऊन विरोधकांनी आवळला सूर

Next

नागपूर : कथित भूखंड घोटाळ्याच्या मुद्यावरून विरोधकांनी आज विधिमंडळ अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. भूखंडाचा श्रीखंड खाणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, मुख्यमंत्री राजीना द्या, अशा घोषणा देत खोके.. खोकेच्या गर्जनांनी परिसर दणाणून सोडला. विरोधीपक्षाच्या आमदारांनी श्रीखंडाच्या डब्या एका मोठ्या डब्ब्यात टाकून सरकारचा निषेध करत संताप व्यक्त केला.

एनआयटीच्याच्या कथित भूखंड घोटाळ्यावरुन मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यावर विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला. राज्यपाल हटाव, महाराष्ट्र बचाओ, दिल्लीचे मिंधे एकनाथ शिंदे, ८३ खोके भूखंड ओके, घ्या खोके भूखंड ओके, राज्यपालांचे करायचे काय खाली डोके वर पाय, मुख्यमंत्री राजीनामा द्या अशा घोषणांनी विधान भवन परिसर आजही दणाणून सोडला. मिंधे सरकार भूखंड घोटाळ्याबाबत चौकशी करण्यास तयार नसल्याचे म्हणत विरोधक आक्रमक झाले व सरकारला विविध मुद्द्यांवरुन घेरलं. तसेच, महापुरुषांचा अपमान करणारे राज्यपाल कोश्यारी यांच्यावर कोणतीही कारवाई न करता मिंधे सरकार मूग गिळून बसले आहे, असा आरोपही विरोधकांनी केला. 

या आंदोलनात विरोधी पक्षनेते अजित पवार, अंबादास दानवे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आदित्य ठाकरे, छगन भुजबळ, राजेश टोपे, सुनील केदार, सुनील प्रभू, रोहित पवार, आदित्य ठाकरे, जयंत पाटील आदि सहभागी होते.

Web Title: opposition leaders agitated against rulling party amid corruption and scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.