लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उत्तर प्रदेशच्या हाथरस येथे वाल्मीकी समाजाच्या तरुणीवर सामूहिक अत्याचाराची घटना आणि पीडित कुटुंबासोबत तेथील शासनाच्या असंवैधानिक व अमानवीय कृतीच्या विरोधात शनिवारी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आक्रोश आंदोलन करण्यात आले. पार्टीचे शहराध्यक्ष रवी शेंडे यांच्या नेतृत्वात संविधान चौक येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी वंचितचे कार्यकर्ते मोठ्या संख्याने उपस्थित होते. दलित समाजाच्या तरुणीवर सवर्ण समाजाच्या तरुणांकडून अमानुषपणे अत्याचार होतो, तिला मरणयातना दिल्या जातात, तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरतात आणि यानंतरही तेथील जातीवादी सरकारच्या नियंत्रणाखाली पोलीस प्रशासनाने आरोपींना पाठीशी घालून पीडित कुटुंबावरच अन्याय केला. मुलीच्या पार्थिवाची विटंबना केल्याचा आरोप करीत उत्तर प्रदेश सरकार तात्काळ बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची आंदोलनादरम्यान मागणी करण्यात आली. याप्रसंगी प्रा. रमेश पिसे, धर्मेश फुसाटे, संजय हेडाऊ, मंगलमूर्ती सोनकुसरे, सुमेध गोंडाने, संजय सूर्यवंशी, अंकुश मोहिले, रमेश कांबळे, अविराज थूल, विनय भांगे, विवेक शेवाळे, अजय सहारे, शुभाश मानवटकर, फूलसर सतीबवाने, प्रवीण पाटील, मिलिंद मेश्राम, आनंद चौरे, देवेंद्र मेश्राम, सुनील कुमार इंगळे, सुमधू गेडाम, राकेश रामटेके, आशीष हुमणे, कांचन देवगडे, माया शेंडे, नालंदा गणवीर, प्रतिमा शेंडे, धम्मदीप लोखंडे, निशांत पाटील, भावेश वानखेडे, अजय बोरकर, अमरदीप तिरपुडे, प्रशांत नारनवरे, विशाल वानखेडे, लहानू बन्सोड, निर्भय बागडे, भरत लांडगे, संदेश खोब्रागडे, धम्मपाल लामसोंगे, मंगेश मेश्राम, देवेन्द्र डोंगरे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.
हाथरसविरोधात वंचित बहुजन आघाडीचा आक्रोश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2020 1:13 AM