नागपुरात २६ लाखांहून अधिक किंमतीची ब्राऊन शुगर व अन्य सामान जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 04:10 PM2018-07-03T16:10:49+5:302018-07-03T16:11:18+5:30
शहरात सोमवारी पोलिसांनी सापळा रचून एका महिलेला अटक केली व तिच्याजवळील ब्राऊन शुगरसह मोबाईल, दुचाकी, रोख रक्कम व अन्य सामान जप्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: शहरात सोमवारी पोलिसांनी सापळा रचून एका महिलेला अटक केली व तिच्याजवळील ब्राऊन शुगरसह मोबाईल, दुचाकी, रोख रक्कम व अन्य सामान जप्त केले. जप्त केलेल्या सामानाची किंमत २६ लाखांहून अधिक आहे.
सोमवारी अंमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस हवालदार तुलसीदास शुक्ला यांना, एक महिला ब्राऊन शुगर घेऊन जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यांनी आवश्यक असलेले पंच व महिला कर्मचारी घेऊन घटनास्थळी सापळा रचला. निर्धारित वेळेत एक महिला दुचाकीवरून आली असता तिची तात्काळ झडती घेण्यात आली. तिच्याजवळ ६५९ ग्रॅम ब्राऊन शुगर, एक होन्डा एव्हिएटर, एक मोबाईल व १० हजारांची रोख रक्कम आढळून आली. या महिलेचे नाव चित्रा मनोज रहांगडाले (३०) रा. इतवारी रेल्वे स्टेशन असे आहे. तिच्यावर पाचपावली ठाण्यात अंमली पदार्थ कायदा कलम २१ क अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई अंमली विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र निकम, सहाय्यक पोलीस निरीक्षक चंदन, पोलीस उप निरीक्षक स्वप्नील वाघ आदींनी केले.