भारतीय मानक ब्यूरोची पॅकेज्ड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2020 04:22 AM2020-11-26T04:22:13+5:302020-11-26T04:22:13+5:30
\Sनागपूर : भारतीय मानक ब्यूरोच्या (बीआयएस) नागपूर शाखेने बीआयएस प्रमाणपत्र अर्थात आयएसआय मार्कविना पॅकेज्ड ड्रिकिंग वॉटरचे (पीडब्ल्यूएस) उत्पादन करणाºया ...
\Sनागपूर : भारतीय मानक ब्यूरोच्या (बीआयएस) नागपूर शाखेने बीआयएस प्रमाणपत्र अर्थात आयएसआय मार्कविना पॅकेज्ड ड्रिकिंग वॉटरचे (पीडब्ल्यूएस) उत्पादन करणाºया
सीजीएचएस कॉम्प्लेक्स, गजानन धामजवळ, सहकारनगर येथील श्रीजी एन्टरप्राईजेसवर धाड टाकून २० लिटर क्षमतेचे ११० पेट जार जप्त केले. या उत्पादकाकडे उत्पादन निर्मितीचा प्रमाणित परवाना नव्हता.
अशा उत्पादनासाठी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या केंद्रीय आरोग्य विभागाने २० सप्टेंबर २००० ला अध्यादेश काढून पॅकेज्ड ड्रिकिंग वॉटर निर्मितीसाठी बीआयएस प्रमाणपत्र अर्थात आयएसआय मार्क घेणे बंधनकारक केले आहे. या प्रमाणपत्राविना कुणीही व्यक्ती पॅकेज्ड ड्रिकिंग वॉटरची निर्मिती आणि विक्री करू शकत नाही. परंतु श्रीजी एन्टरप्राईजेस फर्म या उत्पादनाची निर्मिती करून २० लिटरच्या पेट जारमध्ये भरून विक्री करताना आढळून आले. या फर्मकडे बीआयएसचे प्रमाणपत्र नव्हते. अधिकाऱ्यांनी फर्ममधून ऑक्झिनायझर ब्रॅण्डचे २० लिटर क्षमतेचे ११० पॅकेज्ड ड्रिकिंग वॉटर जार जप्त केले.