शिक्षकांनी बदलावी पालकांची मानसिकता : निशा सावरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 10:49 PM2018-12-28T22:49:18+5:302018-12-28T22:51:09+5:30

कॉन्व्हेंटकडे पालकांचे आकर्षण असल्याने जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या रोडावत आहे. पण जिल्हा परिषदेच्या शाळा आता कॉन्व्हेंटपेक्षा मागे राहिल्या नाही. डिजिटल तंत्रज्ञानापासून भौतिक सोईसुविधासुद्धा उपलब्ध केल्या आहे. फक्त आता पालकांची मानसिकता बदलविणे गरजेचे आहे. जि.प. शिक्षकांनी त्यात योगदान द्यावे. आदर्श शिक्षक पुरस्कार स्वीकारलेल्या शिक्षकांनी ही जबाबदारीच घ्यावी, असे आवाहन जि.प.च्या अध्यक्ष निशा सावरकर यांनी केले.

Parents' mindset to change teachers: Nisha Sawarkar | शिक्षकांनी बदलावी पालकांची मानसिकता : निशा सावरकर

शिक्षकांनी बदलावी पालकांची मानसिकता : निशा सावरकर

googlenewsNext
ठळक मुद्देआदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कॉन्व्हेंटकडे पालकांचे आकर्षण असल्याने जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या रोडावत आहे. पण जिल्हा परिषदेच्या शाळा आता कॉन्व्हेंटपेक्षा मागे राहिल्या नाही. डिजिटल तंत्रज्ञानापासून भौतिक सोईसुविधासुद्धा उपलब्ध केल्या आहे. फक्त आता पालकांची मानसिकता बदलविणे गरजेचे आहे. जि.प. शिक्षकांनी त्यात योगदान द्यावे. आदर्श शिक्षक पुरस्कार स्वीकारलेल्या शिक्षकांनी ही जबाबदारीच घ्यावी, असे आवाहन जि.प.च्या अध्यक्ष निशा सावरकर यांनी केले.
जि.प.च्या शिक्षण विभागातर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभात अध्यक्षीय भाषणात त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार मल्लिकार्जुन रेड्डी, उपाध्यक्ष शरद डोणेकर, शिक्षण सभापती उकेश चव्हाण, सभापती आशा गायकवाड, सदस्य रुपराव शिंगणे, शांता कुमरे, पुष्पा देशभ्रतार, रामदास मरकाम, सुरेंद्र शेंडे, अतिरिक्त कार्यकारी अधिकारी अंकुश केदार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमिला जाखलेकर, महिला व बालक कल्याण अधिकारी भागवत तांबे, समाजकल्याण अधिकारी सुकेशनी तेलगोटे, पंचायत विभागाचे अधिकारी राजेंद्र भुयार आदी उपस्थित होते. जि.प.तर्फे दरवर्षी जिल्ह्यातील १३ प्राथमिक व २ माध्यमिक शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांनी केले. संचालन धर्मेश दुपारे यांनी केले. आभार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश केदार यांनी मानले.
 या शिक्षकांचा झाला सन्मान
नंदा आनंद गिरडकर जि.प. प्रा. शाळा रानमांगली, सुधा विजयराव नाखले जि.प. उच्च प्रा. शाळा खापरी, नितीन रायबोले प्रा. शाळा कवठा, अनिल भेदे प्रा. शाळा चनकापूर, रमेश कांबळे उच्च प्रा.शाळा गोंडी मोहगाव, जयदेव शिऊरकर जि.प. प्रा. शाळा दिघलवाडी, एकनाथ पवार जि.प. प्रा. शाळा बोरीमांजरा, आशिष रंगारी जि.प. प्रा. शाळा डोडमा, रामोजी गिऱ्हे जि.प. प्रा.शाळा सालवा, प्रकाश जवादे जि.प. उच्च. प्रा.शाळा खैरगाव, महेंद्र सोनवाने, जि.प. प्रा.शाळा चिचाडा, रंजना भगवान वैद्य जि.प. हायस्कूल पाचगांव
 एकच मिशन जुनी पेन्शन
२००५ नंतर लागलेल्या शिक्षकांना शासनाने अंशदायी पेन्शन योजना लागू केली आहे. मात्र जुन्याच पेन्शन योजनेचा लाभ शिक्षकांना मिळावा अशी शिक्षकांची मागणी आहे. त्यासाठी आंदोलनेही झाली आहे. आजच्या सत्कार समारंभात सुद्धा नितीन रायबोले या शिक्षकाने जुन्या पेन्शनची मागणी रेटून धरण्यासाठी ‘एकच मिशन जुनी पेन्शन’ अशी टोपी घालून पुरस्कार स्वीकारला.

Web Title: Parents' mindset to change teachers: Nisha Sawarkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.