नागपूर : मनपा व पोलीस प्रशासनाने सीताबर्डी येथील फूटपाथ दुकानदारांना दुकाने लावण्यास मनाई केल्याच्या निषेधार्थ गुरुवारी सीताबर्डी मेन रोडवर शेकडो फूटपाथ दुकानदार रस्त्यावर उतरत निदर्शने केली. मनपा व पोलीस प्रशासनाचा निषेध केला.
कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता राज्य सरकारने राज्यात लॉकडाऊन लावल्यामुळे शेकडो हॉकर्स छोटे दुकानदार यांच्यावर उपासमारीची वेळ आली. मात्र २ जूनपासून लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्यामुळे सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सर्व दुकाने सुरू राहण्याचे आदेश राज्य सरकारने दिले. मात्र राज्य सरकारच्या आदेशाची पायमल्ली करीत सर्व फूटपाथ दुकानदारांवर करवाई करून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आणत असल्याचा आरोप यावेळी फूटपाथ दुकानदारांनी केला. स्थानिक प्रशासनाने याची दाखल न घेतल्यास फूटपाथ दुकानदारांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे..
यावेळी गोपी आंभोरे, अविनाश तिरपुडे, विजय गजभिये, दुर्गादास रमनी, आयाज खन, राजेश राठी, चंदू अग्रवाल, सुनील बागडे आदींसह मोठ्या संख्येने फूटपाथ दुकानदार सहभागी झाले होते.