नागपुरात आॅनलाईन वीजबिल भरण्यासाठी सेवाशुल्क माफक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 11:52 PM2018-02-07T23:52:14+5:302018-02-07T23:54:18+5:30

महावितरणने राज्यातील सर्व ग्राहकांना आॅनलाईन पद्धतीद्वारे वीजदेयक भरण्याची सुविधा २००५ पासून उपलब्ध करून दिली आहे.

To pay online bill in Nagpur, the service fee is reasonable | नागपुरात आॅनलाईन वीजबिल भरण्यासाठी सेवाशुल्क माफक

नागपुरात आॅनलाईन वीजबिल भरण्यासाठी सेवाशुल्क माफक

googlenewsNext
ठळक मुद्देग्राहकांनी आॅनलाईनद्वारेच वीजबिल भरावे : महावितरणचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महावितरणने राज्यातील सर्व ग्राहकांना आॅनलाईन पद्धतीद्वारे वीजदेयक भरण्याची सुविधा २००५ पासून उपलब्ध करून दिली आहे. ग्राहक महावितरणच्या मोबाईल अ‍ॅपद्वारे केव्हाही व कुठूनही आॅनलाईन पद्धतीने वीजदेयकाचा भरणा करू शकतो. या प्रणालीची कार्यपद्धती महावितरणच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. सदर पद्धतीमध्ये वीज ग्राहक त्यांच्या वीज देयकाचा भरणा क्रेडिट, डेबीट कार्ड, नेट बँकिंग व यू.पी.आय. इत्यादी इलेक्ट्रॉनिक माध्यमांमार्फत करू शकतो. या सुविधेसाठी सेवाशुल्क अत्यंत माफक आहेत असे महावितरणने कळविले आहे.
आॅनलाईन पद्धतीने वीजदेयकाचा भरणा करणे अत्यंत सुरक्षित असून, सदर पद्धतीत आर.बी.आय.च्या पेमेंट व सेटलमेंट कायदा २००७ च्या तरतुदी लागू आहेत. आॅनलाईनने वीज देयक भरणा केल्यास ग्राहकांना त्वरित एसएमएस व भरणा पावती दिली जाते. सद्यस्थितीत महावितरणचे ३० लाख ग्राहक सदर सुविधेचा लाभ घेत असून यातून दरमहा महावितरणला आॅनलाईन वीजबिल भरणा पद्धतीद्वारे साधारणत: ६०० कोटी महसुलाची प्राप्ती होते. अशा प्रकारच्या देयकभरणा प्रणालीमध्ये मास्टर, व्हिजासारख्या संस्था क्रेडिट/ डेबीट कार्ड, इत्यादी इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत देयक अदा करण्याच्या सुविधांसाठी सुविधा शुल्क आकारतात. याबाबतीत महावितरणच्या ग्राहकांना आकारले जाणारे सुविधा शुल्क अत्यंत माफक व वाजवी आहे. इतर राज्यातील वीज वितरण कंपन्यांच्या तुलनेत महावितरणच्या ग्राहकांना आकारले जाणारे सुविधा शुल्क अत्यंत कमी आहे.
महावितरणच्या ग्राहकाने क्रेडिट/डेबीट कार्ड, यू.पी.आय. मार्फत वीज देयकाचा भरणा केल्यास रुपये ५०० पर्यंत कोणतेही सुविधा शुल्क आकारले जात नाही. तसेच नेट बँकिंगद्वारे कितीही रकमेपर्यंतचा वीज देयकाचा भरणा केल्यास त्याला कोणत्याही प्रकारचे सुविधा शुल्क भरावे लागत नाही. या दोन्हीही पयार्यासाठीच्या सुविधा शुल्काचा भरणा महावितरणमार्फत करण्यात येतो. आॅनलाईन पद्धतीने वीजबिल भरणा करण्याबाबत काही अडचणी असल्यास व त्यासंदर्भातील तक्रारी निवारण करण्यासाठी महावितरणने एक स्वतंत्र मदत कक्ष स्थापन केला असून ई- मेल आयडीवर मेल केल्यास ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यात येते. त्यामुळे जास्तीतजास्त ग्राहकांनी महावितरणचे मोबाईल अ‍ॅप व संकेतस्थळामार्फत आॅनलाईनद्वारेच वीजबिल भरावे व या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

Web Title: To pay online bill in Nagpur, the service fee is reasonable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.