काटोल, हिंगण्यात बाधितांचा टक्का वाढतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:27 AM2020-12-11T04:27:23+5:302020-12-11T04:27:23+5:30

काटोल/हिंगणा/कळमेश्वर/रामटेक : नागपूर जिल्ह्यात काटोल आणि हिंगणा तालुक्यात कोरोनाची साखळी अद्यापही कायम आहे. जिल्ह्यात गुरुवारी १०१ नागरिकांना कोरोनाची लागण ...

The percentage of people affected by Katol and Hingya is increasing | काटोल, हिंगण्यात बाधितांचा टक्का वाढतोय

काटोल, हिंगण्यात बाधितांचा टक्का वाढतोय

googlenewsNext

काटोल/हिंगणा/कळमेश्वर/रामटेक : नागपूर जिल्ह्यात काटोल आणि हिंगणा तालुक्यात कोरोनाची साखळी अद्यापही कायम आहे. जिल्ह्यात गुरुवारी १०१ नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. हिंगणा तालुक्यात १६६ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. यात सहा नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात वानाडोंगरी येथे चार तर रायपूर व डिगडोह येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली. तालुक्यात आतापर्यंत बाधितांचे प्रमाण ३,६५४ इतके झाले आहे. यातील ३,३५१ रुग्ण बरे झाले आहेत. तालुक्यात आतापर्यंत ८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

काटोल तालुक्यात ९२ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. यात सात नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात काटोल शहरातील द्वारकानगरी, आययूडीपी परिसर, पंचवटी, सरस्वतीनगर, दोडकीपुरा, पेठ बुधवार येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली. ग्रामीण भागात रिधोरा येथे एक रुग्ण आढळून आला. कळमेश्वर तालुक्यात पाच रुग्णाची भर पडली आहे. यात कळमेश्वर शहरात तीन तर मोहपा येथे दोन रुग्णांची नोंद झाली. रामटेक तालुक्यात गुरुवारी पाच रुग्णाची नोंद झाली. यात करवाही येथे दोन तर शीतलवाडी व काचूरवाही येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली. रामटेक शहरात अंबाळा येथे एक रुग्ण आढळून आला. सध्या तालुक्यातील बाधितांची संख्या ८७४ झाली आहे. यातील ७९८ रुग्ण बरे झाले आहेत.

Web Title: The percentage of people affected by Katol and Hingya is increasing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.