लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत घसरणीचा क्रम गुरुवारी सुरू राहिला. गुरुवारी नवी दिल्लीत पेट्रोल प्रती लिटर २१ पैसे तर डिझेलचे दर १८ पैशांनी कमी झाले. दोन्ही इंधनाचे दर पुढेही कमी होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली.अमेरिकेने इराणकडून तेल खरेदी करण्यावर प्रतिबंध लावले आहेत. पण भारत, चीन आणि जपानसह आठ देशांना सूट दिली आहे. त्यामुळे देशात इंधनाच्या किमतीत घसरण होत आहे. मुंबईत इंधनाच्या किमती कमी झाल्या आहेत. पेट्रोल २० पैसे आणि डिझेल १९ पैशांनी स्वस्त झाले आहे. पेट्रोलची किंमत ८३.७२ रुपयांवर गेली आहे. नागपूरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अनुक्रमे १५ पैसे आणि १६ पैशांनी घट होऊन पेट्रोल प्रती लिटर किंमत ८४.१३ रुपये आणि डिझेल ७६.८३ रुपयांवर पोहोचले आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत आणखी घसरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2018 12:46 AM
पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत घसरणीचा क्रम गुरुवारी सुरू राहिला. गुरुवारी नवी दिल्लीत पेट्रोल प्रती लिटर २१ पैसे तर डिझेलचे दर १८ पैशांनी कमी झाले. दोन्ही इंधनाचे दर पुढेही कमी होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली.
ठळक मुद्देनागपुरात पेट्रोल ८४.१३ आणि डिझेल ७६.८३ रुपये