नागपुरात पेट्रोल @ १०२.१४, डिझेल ९२.८१
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2021 11:02 PM2021-06-12T23:02:22+5:302021-06-12T23:02:56+5:30
Petrol hike पेट्रोलने २९ मे रोजी शंभरी गाठली होती. आता त्याच प्रमाणात डिझेलची शंभरीकडे वाटचाल सुरू आहे. २९ मे ते १२ जूनपर्यंत पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलची सातव्यांदा दरवाढ केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पेट्रोलने २९ मे रोजी शंभरी गाठली होती. आता त्याच प्रमाणात डिझेलची शंभरीकडे वाटचाल सुरू आहे. २९ मे ते १२ जूनपर्यंत पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलची सातव्यांदा दरवाढ केली आहे. त्याचा सर्वाधिक त्रास सर्वसामान्यांना सहन करावा लागत आहे.
पेट्रोलियम कंपन्या दरदिवशी २० ते ३० पैशांची दरवाढ करून लोकांच्या खिशातून छुप्या पद्धतीने पैसे काढत आहे. १४ दिवसात पेट्रोल प्रति लिटर २.१० रुपये आणि डिझेल १.८९ रुपयांनी वाढले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती स्थिर असतानाही कंपन्या दरवाढ का करीत आहेत, हा गंभीर प्रश्न आहे. विकासाच्या नावाखाली सरकारने इंधनातून करवसुली सुरू केली आहे. सर्वसामान्य आणि माल वाहतूकदारांना दिलासा देण्यासाठी पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचा जीएसटीमध्ये समावेश करावा, अशी ग्राहक संघटनांची मागणी आहे.