लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘मेट्रो रेल्वे’च्या उभारणीसाठी सीताबर्डी येथील मुंजे चौक येथे वेगाने निर्माण कार्य सुरू आहे. येथे ‘पिलर्स’ उभे करण्यात येत आहे. मात्र या चौकाखालून जाणाऱ्या तीन भूमिगत विद्युत वाहिन्यांवर ‘मेट्रो’ने ‘पिलर’ उभा केल्याची बाब समोर आली आहे. वीज वितरण कंपनी ‘महावितरण’ने यावर हरकत घेत अपघात होण्याची शंकादेखील व्यक्त केली आहे.‘महावितरण’च्या ‘रिजंट’ उपविभागाचे सहायक अभियंता गुरुवारी मुंजे चौकातून जात होते. त्याचवेळी त्यांना फूलबाजाराजवळ ‘मेट्रो’तर्फे बनविण्यात येणारे ‘पिलर’ दिसले. येथून विजेची भूमिगत वाहिनी जात असल्याची माहिती त्यांना होती. त्यांनी तात्काळ आपल्या पथकाला बोलावून निरीक्षण केले व ‘पिलर’खालीच ११ ‘केव्ही’ क्षमतेच्या दोन तर एक ‘एलटी’ वाहिनी असल्याचे दिसून आले. या वाहिन्यांवर ‘कॉंक्रिट’ टाकण्यात आले आहे. याची माहिती त्यांनी तात्काळ आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. मुंजे चौकात काम करणाऱ्या ‘एजन्सी’च्या अधिकाऱ्यांनादेखील याची माहिती देण्यात आली.‘रिजंट’चे उपकार्यकारी अभियंता उदय फरसखानेवाला यांनी सांगितले की, ‘मेट्रो रेल्वे’ला परिसरातून नेमक्या कुठून भूमिगत विद्युत वाहिन्या जात आहे यासंदर्भात माहिती देण्यात आली होती. ज्या ठिकाणी ‘पिलर’ टाकण्यात आला आहे, तेथून जाणारी वाहिनी यशवंत स्टेडियम आणि फूल बाजाराला वीज पुरवठा करते. ‘मेट्रो’ला याची माहिती देण्यात आली आहे.शुक्रवारी ‘मेट्रो’ला पत्र लिहून अधिकृत माहिती देण्यात येईल. विद्युत वाहिनीच्या वर ‘पिलर’ बनविण्यात आल्याने अपघात होण्याची शक्यता त्यांनी नाकारली नाही. ‘आरसीसी पाईप’च्या आतमध्ये ‘इन्सुलेटेड’ वाहिनी टाकण्यात आली आहे. खोदकामात ‘पाईप’ तुटला आहे. ‘मेट्रो’चे काम पूर्ण झाल्यानंतर वाहिनी हटविणे अशक्य होईल.अजनी रेल्वे स्थानकावरदेखील संकटमुंजे चौकाप्रमाणेच अजनी रेल्वे स्थानकावरदेखील ‘मेट्रो रेल्वे’ने विद्युत वाहिन्यांवर ‘पिलर’ उभारला आहे. याची लेखी माहिती ‘मेट्रो’ला देण्यात आली. ‘मेट्रो’ने काम पूर्ण होण्याअगोदर वाहिनी हटविण्याचे आश्वासन दिले असल्याचे उदय फरसखानेवाला यांनी सांगितले.वाहिनी स्थलांतरित करणारयासंदर्भात माहिती मिळताच ‘मेट्रो’ तसेच ‘महावितरण’च्या पथकाने जागेची पाहणी केली. तीनपैकी एक वाहिनी मृत आहे. मात्र इतर वाहिन्यांवर काम झाले आहे. येथील मूलभूत काम झाल्यानंतर ‘मेट्रो’ विद्युत वाहिनीला स्थलांतरित करेल व सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल, असे ‘मेट्रो रेल्वे’ प्रकल्पाचे ‘कॉर्पोरेट कम्युनिकेशन’चे ‘डीजीएम’ अखिलेश हळवे यांनी सांगितले.
नागपुरात चक्क विद्युत वाहिनीवर उभारला ‘मेट्रो’चा ‘पिलर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2018 1:08 AM
‘मेट्रो रेल्वे’च्या उभारणीसाठी सीताबर्डी येथील मुंजे चौक येथे वेगाने निर्माण कार्य सुरू आहे. येथे ‘पिलर्स’ उभे करण्यात येत आहे. मात्र या चौकाखालून जाणाऱ्या तीन भूमिगत विद्युत वाहिन्यांवर ‘मेट्रो’ने ‘पिलर’ उभा केल्याची बाब समोर आली आहे. वीज वितरण कंपनी ‘महावितरण’ने यावर हरकत घेत अपघात होण्याची शंकादेखील व्यक्त केली आहे.
ठळक मुद्देमुंजे चौकात समोर आला हलगर्जीपणा : ‘महावितरण’ने घेतली हरकत