लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य सरकारने प्लास्टीकपासून बनविण्यात येणाऱ्या पिशव्या, थर्माकॉल व प्लास्टीकपासून बनविण्यात येणाऱ्या वस्तूंच्या वापरावर बंदी घातली आहे. शिल्लक असलेला प्लास्टीच्या साठ्याची विल्हेवाट लावण्यासाठी २३ एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या निर्णयाची कठोर अंमलबजावणी करून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांच्या विरोधात नियमानुसार कारवाई केली जाणार आहे. कायद्यात बंदी घातलेल्या प्लास्टीकच्या वस्तूंचे उत्पादन, साठा, विक्री तसेच वापरणाऱ्यांवर ५ ते २५ हजारापर्यंत दंड व तीन महिन्यांची शिक्षा केली जाणार आहे.महाराष्ट्र प्लास्टीक व थर्माकोल अविघटनशील वस्तूंची उत्पादने (उत्पादन, वापर, विक्री, वाहतूक, हाताळणी आणि साठवण) अधिसूचना, २३ मार्चपासून लागू झाली आहे. अधिसूचनेपासून महिना भरात बंदी असलेल्या वस्तूंची विल्हेवाट लावावयाची आहे. यासाठी महापालिकेच्या झोन कार्यालयांच्या ठिकाणी संकलन केंद्र सुरू करण्याचे निर्देश आयुक्त अश्विन मुदगल यांनी दिले आहे. ज्यांच्याकडे बंदी असलेल्या प्लास्टीकचा साठा आहे त्यांना हा साठा राज्याबाहेर विकण्यास मुभा दिली आहे. तसेच संकलन केंद्रावरही प्लास्टीकच्या वस्तू देता येतील. घरोघरी कचरा संकलन करणाऱ्यांना पॅकिंगमध्ये व कचरा गोळा करणाऱ्यांकडे संबंंधितांना अशा वस्तू देता येतील. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लस्टीक पिशव्या वापरण्यावर आधीच बंदी आहे. बंदी असलेल्या पिशव्यांचा वापर व विक्री करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई नियमित कारवाई सुरु आहे. परंतु यातून प्लास्टीकचे समस्या सुटलेली नाही.
५ ते २५ हजारापर्यंत दंड व शिक्षाबंदी असलेल्या प्लास्टीक पिशव्या वा थर्माकोलचा वापर वा विक्री केल्यास संबंधितावर पहिल्यांदा ५ हजार, दुसऱ्यांदा आढळल्यास १० हजार व तिसऱ्यांना प्लास्टीकचा वापर वा विक्री करताना आढळून आल्यास २५ हजार रुपये दंड व ३ महिन्यांची शिक्षा होऊ शकते. यामुळेच बंदी असलेल्या प्लास्टीकच्या वस्तूंची विल्हेवाट लावण्यासाठी २३ एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली आहे.विहीत मुदतीनंतर कारवाईराज्य शासनाच्या अधिसूचनेनुसार प्लास्टीक बंदीच्या निर्णयाची महापालिका स्तरावर अंमलजावणी केली जाणार आहे. बंदी असलेल्या प्लास्टीक व थर्माकॉलच्या वस्तूंची विल्हेवाट लावण्यासाठी २३ एप्रिलपर्यत मुदत देण्यात आली आहे. यासाठी झोन स्तरावर प्लास्टीक संकलन केंद्र सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. कचरा वेचणाऱ्यांना महापालिकेने ओळखपत्र दिले आहे. अशा अधिकृत व्यक्तीकडे प्लास्टीच्या वस्तू विकू वा जमा करू शकतील. निर्धारित कालावधीत जमा असलेला साठा दुसऱ्या राज्यात विकण्याला मुभा आहे. विहित मुदतीनंतर बंदी असलेल्या प्लास्टीक वा थर्माकॉलच्या वस्तू आढळून आल्यास संबंधितावर कारवाई करण्याचे निर्देश महापालिके च्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.- अश्विन मुदगल, आयुक्त महापालिका