बनावट कागदपत्रांच्या आधारे भूखंड विकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:09 AM2021-04-02T04:09:19+5:302021-04-02T04:09:19+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - बनावट कागदपत्रांच्या आधारे जास्तीच्या जागेत ले-आऊट टाकून एका त्रिकूटाने अनेकांना भूखंड विकले. ते भूखंड ...

Plots sold on the basis of forged documents | बनावट कागदपत्रांच्या आधारे भूखंड विकले

बनावट कागदपत्रांच्या आधारे भूखंड विकले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - बनावट कागदपत्रांच्या आधारे जास्तीच्या जागेत ले-आऊट टाकून एका त्रिकूटाने अनेकांना भूखंड विकले. ते भूखंड अनधिकृत असल्याचे आता २० वर्षांनंतर उघड झाल्याने बेलतरोडी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. शालिकराम उद्धवजी ढोरे (वय ७७, रा. छत्रपतीनगर), नारायण जागोबाजी पाहुणे (वय ८०, रा. गरोबा मैदान) आणि मुकुंद शामलाल गोटे (वय ६५, रा. दीक्षित वाडा, सीताबर्डी), अशी आरोपींची नावे आहेत.

बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत या त्रिकूटाने संगनमत करून २००१ मध्ये वेगवेगळ्या जागेवर एका ठिकाणी पाचऐवजी नऊ एकरात तर दुसऱ्या ठिकाणी चारऐवजी नऊ एकरात ले-आऊट टाकले. तेथील जागेचे बनावट नकाशे तयार करून, आरोपींनी ते वेगवेगळ्या लोकांना दाखविले आणि लाखो रुपयात तेथे भूखंड विकले. दरम्यान, आरएल काढण्याच्या प्रयत्नात कागदपत्रे सादर करताना ही बनवाबनवी उघड झाली. त्यामुळे राहुल गजानन राऊत (वय ३८) यांनी बेलतरोडी पोलिसांकडे तक्रार नोंदविली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.

----

Web Title: Plots sold on the basis of forged documents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.