लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: जळित प्रकरणातील प्राध्यापिकेचा मृतदेह घेऊन तिचे नातेवाईक हिंगणघाटकडे रवाना झाले असून, तिच्या मूळगावी तणावपूर्ण शांतता असून पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त केला आहे.3 डिसेंबर रोजी पेट्रोल टाकून पेटवण्यात आलेल्या प्राध्यापिकेने सोमवारी नागपुरातील खासगी रुग्णालयात आपला अखेरचा श्वास घेतला. तिचा मृतदेह आम्ही तोपर्यंत उचलणार नाही जोपर्यंत शासनाकडून लेखी आश्वासन मिळत नाही, अशी भूमिका तिच्या नातेवाईकांनी घेतली होती. मात्र मात्र राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक मंत्री सुनिल केदार व माजी उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात नातेवाईकांची समजूत घातल्यानंतर त्यांनी मृतदेह स्वीकारला व ते हिंगणघाटकडे रवाना झाले.
श्रद्धांजली अर्पण करून पीडितेच्या शाळेला दिली सुट्टीवर्धा, हिंगणघाट येथील जळीत पीडितेचीआज सकाळी साडे सहा च्या सुमारास निधन झाले. या घटनेची वार्ता शाळेच्या मुख्याध्यापकेस शाळेतील विद्यार्थ्यांना मिळताच पीडितेच्या शाळेत शोकसभा घेऊन पीडितेला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली, त्यानंतर शाळेला सुट्टी देण्यात आली