शहरं
Join us  
Trending Stories
1
बायडेन यांच्यासारखी मोदींची स्मरणशक्ती हरवत चालली हे राहुल गांधींचे वक्तव्य दुर्दैवी; परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया
2
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...
3
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
4
वक्फ बोर्डच्या १० कोटींच्या निधीबाबत देवेंद्र फडणवीसांचे ट्विट; म्हणाले, "नवीन सरकार येताच..."
5
Ayush Badoni ची कॅप्टन्सी! प्लेइंग इलेव्हनमधील सर्वांनी गोलंदाजी करत सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
6
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
7
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
8
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
9
रश्मिका मंदानाने केला 'सामी सामी' वर डान्स, हटके ब्लॅक साडीत दिसतेय हॉट!
10
एकनाथ शिंदे नाही, तर कोण? शिवसेनेतून उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' 5 नावांची चर्चा...
11
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"
12
Samantha Ruth Prabhu: समंथा रुथ प्रभूच्या वडिलांचं निधन, अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट
13
म्हशीमुळे मालकाला भरावा लागला ९ हजार रुपयांचा दंड; असं काय घडलं?
14
तुमचा पगार, पॅकेजच नाही, ऑफिसमध्ये या ९ गोष्टीही बोलू नका; नोकरी करताय तर नक्कीच घ्या हा सल्ला...
15
Ananya Panday : चंकी पांडे यांच्या 'या' कृतीने अनन्या पांडे त्रस्त; इन्स्टाग्राम डिलीट करण्याचा दिला सल्ला
16
"तुमचा मित्र हिंदूंना चिरडतोय"; इन्फोसिसच्या माजी सीईओंनी मोहम्मद युनूस यांच्या मित्राला सुनावलं
17
तिढा सुटेना, महायुतीचे नेते पुन्हा दिल्लीला जाणार, का होतोय सत्तास्थापनेस उशीर? 
18
Video: 'सुपरमॅन' कॅच! तुफान वेगाने जाणाऱ्या चेंडूवर फिल्डरने हवेतच घेतली चित्त्यासारखी झेप
19
एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा; राजकीय गदारोळात उदय सामंतांकडून महत्त्वाचा खुलासा
20
गोंदिया-कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात! ११ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर

पोलिटीकल दांडिया !

By admin | Published: September 27, 2014 2:36 AM

घटस्थापनेच्या मुहूर्तावर युती व आघाडीत काडीमोड झाल्यानंतर शुक्रवारी चारही पक्षांमध्ये दिवसभर ‘पोलिटिकल दांडिया’ खेळल्या गेला.

नागपूर : घटस्थापनेच्या मुहूर्तावर युती व आघाडीत काडीमोड झाल्यानंतर शुक्रवारी चारही पक्षांमध्ये दिवसभर ‘पोलिटिकल दांडिया’ खेळल्या गेला. उमेदवार निश्चित करण्यासाठी सर्वच पक्षांचा कस लागला. भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाड्यावर बैठकांचे सत्र आटोपत भाजपचे एकएक उमेदवार निश्चित झाले. हिंगण्यात समीर मेघे तर सावनेरमध्ये सोनबा मुसळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. दक्षिण नागपूर, रामटेक, काटोलसाठी रस्सीखेच सुरू राहिली. तर, काँग्रेसचे माजी मंत्री मुकुल वासनिक यांच्या बंगल्यावर ग्रामीणचे उमेदवार ठरले. मध्यरात्रीनंतर कामठीतून राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.काँग्रेसने हिंगणा मतदारसंघासाठी युवक काँग्रेसच्या अध्यक्ष कुंदा राऊत, काटोलमध्ये दिनेश ठाकरे व उमरेडमध्ये संजय मेश्राम यांचे नाव निश्चित केले. काँग्रेसचे असंतुष्ट आमदार दीनानाथ पडोळे यांना ‘आॅफर’ देत राष्ट्रवादीने काँग्रेसच्या मतदारसंघांत ‘आॅपरेशन सर्च’राबविले. केंद्रीय नेते खा. प्रफुल्ल पटेल दिवसभर नागपुरात तळ ठोकून होते. दक्षिणमध्ये किरण पांडव याची उमेदवारी जाहीर झाली असताना शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष शेखर सावरबांधे यांनी एबी फॉर्म मिळाला तर लढण्याची इच्छा व्यक्त करीत धनुष्य ताणला. शिवसेनेतर्फेही भाजपच्या असंतुष्टांना खेचण्याचे प्रयत्न झाले. बसपाने आठ उमेदवारांची तर मनसेनेही सहा उमेदवारांची घोषणा केली. भाजपने दुपारी अर्ज भरणाऱ्या आमदारांची नावे रात्री रीतसर जाहीर केली तर राष्ट्रवादीनेही अनिल देशमुख (काटोल) व रमेश बंग (हिंगणा) या दुपारी अर्ज भरलेल्या नेत्यांची नावे रात्री जाहीर केली.