बेझनबागेतील वीजलाईन भूमिगत होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:07 AM2021-07-20T04:07:10+5:302021-07-20T04:07:10+5:30
नागपूर : बेझनबाग परिसरातील विजेची लाईन भूमिगत करण्यात येणार आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या हस्ते सोमवारी या कामाचे भूमिपूजन ...
नागपूर : बेझनबाग परिसरातील विजेची लाईन भूमिगत करण्यात येणार आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या हस्ते सोमवारी या कामाचे भूमिपूजन पार पडले. महावितरणतर्फे उत्तर नागपुरातील वीज वितरण यंत्रणा आणखी सक्षम करण्यासाठी ८.७३ कोटी रुपयाची कामे सुरू आहेत.
सोमवारी बेझनबाग येथील बुद्धविहाराजवळ लघुदाब वीजलाईनला भूमिगत करण्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. महावितरणचे अधीक्षक अभियंता अमित परांजपे, सिव्हिल लाईन्सचे कार्यकारी अभियंता राजेश घाटोळे, अतिरिक्त कार्यकार अभियंता गिरीधर सोरटे, उपकार्यकारी अभियंता निशा चौधरी, उपअभियंता सचिन भागवत, मनपाच्या मुख्य अभियंता लीना उपाध्याय उपस्थित होत्या. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून हे काम करण्यात येणार आहे. याअंतर्गत नवीन ट्रान्सफार्मर लावण्यात येतील. जुन्या ट्रान्सफार्मरची क्षमता वाढविण्यात येईल. वीजलाईनचे स्थानांतरण होणार. विशेष घटक योजनेच्या लाभार्थ्यांना तातडीने वीज कनेक्शन वितरित करण्यात येतील.