लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रीय स्वयंंसेवक संघाच्या तृतीय शिक्षा वर्गाच्या समारोपासाठी नागपुरात आलेले माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी शुक्रवारी दिल्लीला परतले. दुपारी १ वाजता इंडिगो विमानाने ते दिल्लीसाठी रवाना झाले. प्रणवदांचा व्यासंग विमान प्रवासातही दिसून आला. प्रणवदांनी विमानात येताच सर्वांना नमस्कार केला. यानंतर आपल्या पहिल्या रांगेतील खुर्चीवर बसून पुस्तक वाचण्यात मग्न झाले.मुखर्जी हे माजी राष्ट्रपती असल्यामुळे त्यांना विशेष दर्जा प्राप्त आहे. ते विशेष विमानानेही जाऊ शकले असते. मात्र, त्यांनी स्वत:च विशेष सोय करून घेणे टाळले. शुक्रवारीही प्रणवदा यांनी कुणाला भेट देणे टाळले. राजभावनात त्यांच्या भेटीसाठी अनेकांनी फोन केले होते. पण ते इच्छुक नसल्यामुळे कुणालाही भेटीसाठी वेळ देण्यात आली नाही. प्रणवदांनी सकाळी राजभवनात नाश्ता घेतला व त्यानंतर राजभवनामध्ये कार्यरत अधिकाऱ्यांशी चर्चेत ते रमले. सर्वांची आस्थेने चौकशी केली. अधिकारी-कर्मचाराष्ट्रीय स्वयंंसेवक संघाच्या तृतीय शिक्षा वर्गाच्या समारोपासाठी नागपुरात आलेले माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी शुक्रवारी दिल्लीला परतले. दुपारी १ वाजता इंडिगो विमानाने ते दिल्लीसाठी रवाना झाले. प्रणवदांचा व्यासंग विमान प्रवासातही दिसून आला. प्रणवदांनी विमानात येताच सर्वांना नमस्कार केला. यानंतर आपल्या पहिल्या रांगेतील खुर्चीवर बसून पुस्तक वाचण्यात मग्न झाले.सोबत फोटो काढले. राजभवनाची माहिती घेतली. प्रणवदांच्या साधेपणामुळे सारेच सुखावले, असे राज्यपालांचे अतिरिक्त परिवार प्रबंधक रमेश येवले यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. दरम्यान, परतीच्या प्रवासातही स्थानिक काँग्रेस नेते प्रणवदांना निरोप देण्यासाठी विमानतळावर गेले नाही. हा पक्षाचा अधिकृत दौरा नसल्याचे सांगत सर्वांनी भेट घेणे टाळले.