लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : निवडणूक आयोगाने ओडिशा कॅडरचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी प्रसन्ना कुमार जेना यांची रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी केंद्रीय निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. प्रसन्ना कुमार जेना हे ओडिशा कॅडरच्या २००५ बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. रामटेक लोकसभा मतदारसंघात मुक्त वातावरणात निवडणुका घेण्याच्या दृष्टीने मतदारांसाठी त्या रविभवन येथे उपलब्ध राहणार आहेत. लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूकसंदर्भात त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आढावा घेतला. निवडणूक निरीक्षक प्रसन्ना कुमार जेना यांचा मुक्काम रविभवन कॉटेज क्रमांक ९ येथे असून त्यांचा भ्रमण ध्वनिक्रमांक ९०२२२०७०९० असा आहे. सर्व मतदारांना ते सकाळी ११ ते १ या वेळेत रवीभवन येथे उपलब्ध आहेत.विनोद कुमार केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षकनिवडणूक आयोगाने भारतीय रेव्हेन्यू सेवेचे वरिष्ठ अधिकारी विनोद कुमार यांची नागपूर लोकसभा मतदार संघासाठी केंद्रीय निवडणूक निरीक्षक (खर्च) म्हणून नियुक्ती केली आहे. विनोद कुमार हे आर.आय.एस. २००५ या बॅचचे अधिकारी आहेत.नागपूर लोकसभा मतदार संघात मुक्त वातावरणात निवडणुका घेण्याच्यादृष्टीने मतदारांसाठी रविभवन कॉटेज क्रमांक सी-७ येथे सकाळी ११ ते १ या कालावधीत उपलब्ध राहणार आहेत. त्यांचा दूरध्वनी क्रमांक ०९९६९२३५०९९ हा आहे. व रविभवन कॉटेज येथील दूरध्वनी क्रमांक ०७१२-२५२२८६३ असा आहे.दिनेश कुमार यादव केंद्रीय पोलीस निवडणूक निरीक्षकनिवडणूक आयोगाने भारतीय पोलीस सेवेचे वरिष्ठ अधिकारी दिनेश कुमार यादव यांची रामटेक व वर्धा लोकसभा मतदार संघासाठी केंद्रीय पोलीस निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. दिनेश कुमार यादव हे आय.पी.एस. १९९८ या बॅचचे अधिकारी आहेत. रामटेक लोकसभा मतदार संघात मुक्त वातावरणात निवडणुका घेण्याच्यादृष्टीने मतदारांसाठी रविभवन कॉटेज क्रमांक ३ येथे सकाळी १० ते ११ या कालावधीत उपलब्ध राहणार आहेत. त्यांचा दूरध्वनी क्रमांक ९०२२२२३६९७, ९६३५००५२६२ असा आहे.