तयारी अंतिम टप्प्यात; सरसंघचालकांनाही अयोध्येतील सोहळ्याचं खास निमंत्रण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 03:24 PM2024-01-11T15:24:40+5:302024-01-11T15:31:39+5:30
राजकीय नेते, उद्योगपती, सेलिब्रिटी, क्रिकेटर्सं आणि कारसेवकांचा समावेश आहे. आता, सरसंघचालक मोहन भागवत यांनाही विशेष निमंत्रण देण्यात आलं आहे.
नागपूर - अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या अयोध्येतील प्रभू श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा २२ जानेवारीला होत आहे. अवघ्या काही दिवसांत गेल्या ३० वर्षांपासूनचे पाहिलेले रामभक्तांचे स्वप्न सत्यात उतरत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते रामललाची मंदिरात प्राणप्रतिष्ठा होईल. त्यासाठी, देशभरातील अनेक मान्यवरांना विशेष निमंत्रण देण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी तब्बल ११ हजार व्हीआयपींना बोलावण्यात आले आहे. त्यामध्ये, राजकीय नेते, उद्योगपती, सेलिब्रिटी, क्रिकेटर्सं आणि कारसेवकांचा समावेश आहे. आता, सरसंघचालक मोहन भागवत यांनाही विशेष निमंत्रण देण्यात आलं आहे.
राम मंदिर बांधकाम समितीचे प्रमुख न्रीपेंद्र मिश्रा आणि विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष अलोक कुमार यांनी नागपूर येथे जाऊन सरसंघचालक मोहन भागवत यांनी भेट घेतली. यावेळी, त्यांनी सरसंघचालकांना निमंत्रण पत्रिका देत, प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आग्रहाचे निमंत्रण दिले. त्यामुळे, आता सरसंघचालकही राम मंदिर सोहळ्यासाठी अयोध्येला जाणार असल्याचे स्पष्ट होत आहे. दरम्यान, राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण देण्याचं काम अंतिम टप्प्यात असून काँग्रेसने या सोहळ्याचं निमंत्रण नाकारलं आहे. त्यावरुन, भाजपा नेत्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
Ayodhya Ram Temple Construction Committee Chairman, Nripendra Mishra and International Working President of Vishwa Hindu Parishad, Alok Kumar gave an invitation to the Ram Temple 'Pran Pratishtha' ceremony to Rashtriya Swayamsevak Sangh chief, Mohan Bhagwat, today. pic.twitter.com/ddGiC1FCra
— ANI (@ANI) January 10, 2024
भाजपाचा काँग्रेसवर निशाणा
अयोध्येत होणाऱ्या श्रीराम मंदिराचे (Ram Mandir) उद्घाटन आणि रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर काँग्रेसने (Congress) बहिष्कार टाकला आहे. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी (Sudhanshu Trivedi) यांनी गुरुवारी (11 जानेवारी) काँग्रेसने बहिष्कार टाकलेल्या सर्व कार्यक्रमांची यादीच वाचली. त्रिवेदी म्हणाले की, 'काँग्रेसवाले नेहमी नकारात्मक राजकारण करतात आणि प्रत्येक गोष्टीवर बहिष्कार टाकतात. त्यामुळेच देशातील जनतेनेही काँग्रेसवर बहिष्कार टाकला आहे. भारताचा इतिहास पाहिला तर कॉंग्रेसने प्रत्येक चांगल्या गोष्टींवर बहिष्कार टाककला आहे.'