प्रसूती व स्त्रीरोग संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ. मुखर्जी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:09 AM2021-05-16T04:09:11+5:302021-05-16T04:09:11+5:30
नागपूर : प्रसूती व स्त्रीरोग संघटना, नागपूरच्या अध्यक्षपदी डॉ. अलका मुखर्जी तर सचिवपदी डॉ. आशिष कुबडे यांची निवड करण्यात ...
नागपूर : प्रसूती व स्त्रीरोग संघटना, नागपूरच्या अध्यक्षपदी डॉ. अलका मुखर्जी तर सचिवपदी डॉ. आशिष कुबडे यांची निवड करण्यात आली. कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा आभासी स्वरूपात रविवार १६ मे रोजी होणार आहे. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय प्रसूती व स्त्रीरोग महासंघाचे अध्यक्ष डॉ. अल्पेश गांधी, लाभले, हॉवर्ड विद्यापीठाचे डॉ. थॉमस बुर्केव महापौर दयाशंकर उपस्थित राहतील.
कार्यकारिणीमध्ये डॉ. मुखर्जी व कुबडे यांच्यासह नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. वर्षा ढवळे, उपाध्यक्ष डॉ. सुषमा देशमुख, कोषाध्यक्ष डॉ. प्रगती खळतकर, उपसचिव डॉ. सुमित बाहेती, सहकोषाध्यक्ष डॉ. रश्मी भैसारे, चिकित्सा बैठक प्रभारी डॉ. शांतला भोळे, भूतपूर्व अध्यक्ष डॉ. वैदेही मराठे, माजी सचिव डॉ. राजसी सेनगुप्ता, फॉग्सी महासंघ प्रतिनिधी डॉ. मंगला घिसाड, राज्य संघटना अमॉग्स प्रतिनिधी डॉ. क्षमा केदार यांच्यासह सदस्य म्हणून डॉ. अमोघ चिमोटे, डॉ. अंजली धोटे डांगे, डॉ. अनुपमा भुते, डॉ. आरती वंजारी, डॉ. भक्ती गुर्जर, डॉ. मनीषा साहू, डॉ. नीता सप्रे, डॉ. निधी चांडक, डॉ. पारूल सावजी, डॉ. रचिता पहुकर, डॉ. रिजू चिमोटे, डॉ. शशिकांत रघुवशी, डॉ. शिवांगी जहागीरदार, डॉ. स्वाती कोटपल्लीवार, डॉ. स्वाती खांडेकर, डॉ. स्वाती सारडा, डॉ. त्रिशला ढेमरे, डॉ. विजयलक्ष्मी कोठाळकर, डॉ. यामिनी काळे यांचा सहभाग आहे.