पंतप्रधान करणार ‘आयआयएम’, ‘एम्स’चे भूमिपूजन

By admin | Published: November 2, 2015 02:05 AM2015-11-02T02:05:13+5:302015-11-02T02:05:13+5:30

राज्य शासनातर्फे ‘आयआयएम’ (इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट) व ‘एम्स’ला (आॅल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेस) मिहान परिसरात जागा देण्यात आली आहे.

The Prime Minister will be the 'IIM', 'AIIMS' Bhumi Pujan | पंतप्रधान करणार ‘आयआयएम’, ‘एम्स’चे भूमिपूजन

पंतप्रधान करणार ‘आयआयएम’, ‘एम्स’चे भूमिपूजन

Next

मुख्यमंत्र्यांची माहिती : विधी विद्यापीठाच्या कुलगुरूंची नेमणूक लवकरच
ंनागपूर : राज्य शासनातर्फे ‘आयआयएम’ (इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट) व ‘एम्स’ला (आॅल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेस) मिहान परिसरात जागा देण्यात आली आहे. येत्या दीड महिन्यात या संस्थांच्या इमारतींच्या बांधकामाला सुरुवात होईल व भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नागपुरातील टिळक पत्रकार भवनात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली.
‘आयआयएम’ व ‘एम्स’च्या इमारतीचे भूमिपूजन सोबतच करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाबाबत पंतप्रधान येणार असून त्यांच्या कार्यालयातून याबाबत विचारणा झाली आहे. याची तारीख अंतिम व्हायची आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. नागपुरात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, ‘ट्रिपल आयटी’ (इंडियन इस्टिट्यूट आॅफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी), राष्ट्रीय महाराष्ट्र विधी विद्यापीठ तसेच ‘नायपर’ यांची घोषणा झाली. यातील ‘ट्रिपल आयटी’ व राष्ट्रीय महाराष्ट्र विधी विद्यापीठाची जागा अंतिम झाली आहे. विधी विद्यापीठाचे काम एव्हाना सुरू व्हायला हवे होते. परंतु यातील कायद्याच्या वाक्यरचनेमुळे कायदेशीर तांत्रिक त्रुटी निर्माण झाली होती. संबंधित विद्यापीठाचा कुलगुरू त्याच विद्यापीठातील असावा, अशी ही वाक्यरचना होती. परंतु विद्यापीठच अस्तित्वात नसल्याने कुलगुरू कुठून येणार, असा प्रश्न उभा ठाकला. त्यामुळे यात सुधारणा करण्यात आली असून आता याच्या स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे.
लवकरच या विद्यापीठाचे कुलगुरू व प्रशासकीय अधिकारी नेमण्यात येतील. शिवाय याची इमारत उभी होण्याची वाट न पाहता ‘जोती’ (ज्युडिशियल आॅफिसर्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूट) येथे वर्ग सुरू करण्यात येतील, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. गोंडवाना विद्यापीठासाठी देखील गडचिरोली येथे जागा पाहण्यात आली आहे.
ही जागा वन विभागाच्या अखत्यारित असून लवकरच येथील अडचणी सोडवून ही जागा विद्यापीठाच्या ताब्यात देण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

नासुप्रने मागितले ३६ कोटी
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अगोदर उत्तर नागपुरात येणार होते. परंतु येथील जागेच्या हस्तांतरणासाठी नासुप्रने ३६ कोटी रुपये मागितले. दुसरीकडे या महाविद्यालयासाठी मिहान येथे जागा आरक्षित केली होती. त्यामुळे हे महाविद्यालय तेथे उभारण्यात येणार आहे. उत्तर नागपुरात कौशल्य विकास संस्था सुरू करण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. नागपुरातील शैक्षणिक संस्था लवकरात लवकर उभारण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचेदेखील त्यांनी प्रतिपादन केले.

Web Title: The Prime Minister will be the 'IIM', 'AIIMS' Bhumi Pujan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.