यशोधरानगरातील बुकीकडे छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:08 AM2021-04-14T04:08:21+5:302021-04-14T04:08:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - यशोधरानगरातील एका बुकीकडे छापा घालून त्याला टी-२० सामन्यावर खयवाडी करताना रंगेहात पकडले. शिवकुमार रामदास ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - यशोधरानगरातील एका बुकीकडे छापा घालून त्याला टी-२० सामन्यावर खयवाडी करताना रंगेहात पकडले. शिवकुमार रामदास कश्यप असे बुकीचे असून पोलिसांनी त्याच्याकडून टीव्ही, मोबाईलसह पाच फोन जप्त केले.
अरविंदनगरातील रहिवासी असलेला शिवकुमार रामदास कश्यप हा बुकी क्रिकेट सामन्यावर सट्टा घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी सोमवारी रात्री त्याच्याकडे छापा घातला. आरोपी कश्यप हा किंग इलेव्हन पंजाब विरुद्ध राजस्थान रॉयल संघात सुरू असलेल्या टी/२० क्रिकेट सामन्यावर मोबाईलच्या माध्यमातून सट्टा घेत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून एलईडी, पाच मोबाईल फोन आणि इतर साहित्य जप्त केले. पोलीस उपायुक्त नीलोत्पल, सहायक आयुक्त रोशन पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली यशोधरानगर पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली.
----
बुकींची वळवळ सुरूच
प्रत्येक आयपीएलमध्ये नागपूरचा बुकी बाजार कमालीचा गरम असतो. येथील बुकी कोट्यवधींची हार-जित करतात. त्यांचे गोवा, दुबईसह ठिकठिकाणच्या बुकींसोबत संबंध असल्याचे लक्षात आल्याने पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी शहरातील मोठ्या बुकींना गेल्या वर्षी वेगळ्या स्टाईलने समजाविले. त्यामुळे काही बुकी शहरातून पसार झाले. मात्र, वेगवेगळ्या जणांच्या नावाने बुकींकडून मोठी रक्कम उकळणाऱ्या दलालांच्या एका टोळीने काही बुकींना कारवाई होणार नाही, असे आश्वासन दिल्यामुळे नागपुरात पुन्हा बुकींची वळवळ सुरू झाली आहे.
-----