चीनमध्ये मेट्रोच्या कोचेस निर्मितीला सुरुवात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 11:56 PM2018-07-19T23:56:03+5:302018-07-19T23:56:49+5:30

नागपूर शहराच्या सर्वांगीण विकासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या नागपूर मेट्रो प्रकल्पाचे कार्य वेगाने पूर्ण होत असून आता मेट्रोच्या कोचेस निर्मितीला सुरुवात झाली आहे. चीन येथील सीआरआरसी कंपनीच्या कारखान्यात हे कोचेस तयार करण्यात येत आहे. महामेट्रो अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या कार्याची औपचारिक सुरुवात झाली.

Production of metro coaches in China began | चीनमध्ये मेट्रोच्या कोचेस निर्मितीला सुरुवात 

चीनमध्ये मेट्रोच्या कोचेस निर्मितीला सुरुवात 

Next
ठळक मुद्दे चार महिन्यात तयार होणार कोचेस : महामेट्रोच्या उपस्थितीत परीक्षण

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : नागपूर शहराच्या सर्वांगीण विकासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या नागपूर मेट्रो प्रकल्पाचे कार्य वेगाने पूर्ण होत असून आता मेट्रोच्या कोचेस निर्मितीला सुरुवात झाली आहे. चीन येथील सीआरआरसी कंपनीच्या कारखान्यात हे कोचेस तयार करण्यात येत आहे. महामेट्रो अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या कार्याची औपचारिक सुरुवात झाली.
नागपूर मेट्रो प्रकल्पासाठी लागणारे संपूर्ण कोचेस आगामी चार महिन्यांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. कोचेस तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण होताच डालियन येथे या कोचेसचे अंतिम परीक्षण करण्यात येईल. अंतिम परीक्षणात कोचेसमध्ये लागणारे उपकरण, बैठक सीट व इतर बाबी तपासल्या जातील. संपूर्ण प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडल्यानंतर कोचेस नागपुरात येण्यास सज्ज असतील.
कोच डिझाईन तयार करण्याचे कार्य एप्रिल २०१७ मध्ये सुरू झाले. त्यानंतर मार्च २०१८ पासून प्रायोगिक तत्त्वावर कोच बनविण्याचे आले. चीन येथे प्रायोगिक तत्त्वावर तयार करण्यात आलेल्या मेट्रो कोचेसचे परीक्षण महामेट्रो अधिकाऱ्यांच्या उपस्थित करण्यात आले. परीक्षण केल्यानंतर कोचेसच्या निर्मिती प्रक्रियेस मेट्रो अधिकाऱ्यांनी संमती दर्शविली.
अनेक प्रक्रिया पूर्ण करून हे कोचेस तयार केले जातात. प्रत्येक प्रक्रियेत कोचेसची उपयोगिता तपासली जाते. प्रत्येक प्रवाशाचा विचार करून हे कोचेस तयार करण्यात येत आहेत. प्रत्येक बाबींवर अगदी बारकाईने लक्ष देऊन हे कार्य पूर्ण केले जाते. प्रामुख्याने संगणकाच्या मदतीने स्टेनलेस स्टीलचे शीट्स आवश्यक त्या आकारानुसार कापल्या जातात व रोबोटच्या मदतीने वेल्डिंग केले जाते. याचवेळी कोचेसमध्ये लागणारे इन्व्हर्टर आणि इतर काही उपकरणे जपानमध्ये तयार केली जात आहेत.

Web Title: Production of metro coaches in China began

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.