प्रस्तावित मेट्रो स्टेशनला दीक्षाभूमीची प्रतिकृती दर्शविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 10:48 PM2018-04-05T22:48:08+5:302018-04-05T22:48:24+5:30

नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पातील मेट्रो स्टेशनला दीक्षाभूमीची प्रतिकृती दर्शविण्याबाबत विचार करण्यात येत असल्याचे मेट्रो रेल्वेचे कार्यकारी संचालक नंदनवार यांनी पत्राद्वारे कळविले आहे.

The proposed metro station will show a replica of Dikshabhoomi | प्रस्तावित मेट्रो स्टेशनला दीक्षाभूमीची प्रतिकृती दर्शविणार

प्रस्तावित मेट्रो स्टेशनला दीक्षाभूमीची प्रतिकृती दर्शविणार

googlenewsNext
ठळक मुद्देनागपूरच्या वैभवात आणखी भर पडेल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात मेट्रो रेल्वेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकार होत असून, नागपुरात जवळपास ४० स्टेशन्स कार्यान्वित करण्यात येत आहे. यापैकी अनेक स्टेशन्सला ऐतिहासिक रूप देण्यात येत आहे. त्याच धर्तीवर संविधान चौक, अजनी रेल्वे स्टेशन, वर्धा रोड, रहाटे कॉलनी अथवा कोणत्याही मेट्रो स्टेशनपैकी एका स्टेशनला दीक्षाभूमी स्तुपाची प्रतिकृती दर्शविण्याबाबत दीक्षाभूमी स्तूप प्रतिकृती मेट्रो स्टेशनला द्यावी, अशी मागणी दीक्षाभूमी स्तूप प्रतिकृती मेट्रो रेल्वे स्टेशन आॅर्गनायझेशनचे संयोजक सुदर्शन गोडघाटे व डॉ. सोहन चवरे यांनी मेट्रो प्रकल्पाचे मुख्य व्यवस्थापक ब्रिजेश दीक्षित यांच्याकडे केली होती. या निवेदनाची मेट्रोने दखल घेतली असून, नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पातील मेट्रो स्टेशनला दीक्षाभूमीची प्रतिकृती दर्शविण्याबाबत विचार करण्यात येत असल्याचे मेट्रो रेल्वेचे कार्यकारी संचालक नंदनवार यांनी पत्राद्वारे कळविले आहे.
नागपूर येथे ऐतिहासिक दीक्षाभूमी असून लाखो अनुयायांसोबत भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. त्यामुळे नागपूरची ओळख ही आंतरराष्ट्रीय स्तरावर झाली आहे. नागपुरात साकार होत असलेल्या मेट्रो रेल्वे स्टेशनला ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या वास्तूंचे स्वरूप देण्यात येत आहे. त्याच धर्तीवर संविधान चौक येथील महामानवाचा पुतळा असून हा चौक क्र ांतीचे स्फूर्तीस्थान ठरला आहे. तर अजनी रेल्वे स्टेशन येथे दरवर्षी लाखो बौद्ध अनुयायांचे धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पावनपर्वावर आगमन होत असते. तसेच रहाटे कॉलनी वर्धा रोड येथून दीक्षाभूमीचे अंतर अगदी जवळ असल्यामुळे या गोष्टीचे औचित्य साधून या ठिकाणी साकार होत असलेल्या कोणत्याही एका स्टेशनला दीक्षाभूमी येथील स्तुपाच्या प्रतिकृतीचे प्रतिबिंब दाखविल्यास नागपूरच्या वैभवात आणखी भर पडेल. तसेच केंद्र व राज्य सरकार साजरा करीत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवानिमित्त एक अभिवादन व आदरांजली ठरेल, अशा आशयाचे निवेदन संघटनेतर्फे देण्यात आले होते. मेट्रोच्या सकारात्मक कृतीमुळे नागपूरच्या वैभवात आणखी भर पडणार आहे.

 

Web Title: The proposed metro station will show a replica of Dikshabhoomi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.