लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर शहरात प्रचंड रोष दिसून येत आहे. शुक्रवारी जागोजागी शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. लोकांनी पाकिस्तानविरोधात प्रचंड निदर्शने केली. अनेक ठिकाणी तर पाकिस्तानचे झेंडेदेखील जाळण्यात आले. दहशतवाद्यांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.नागरिकांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध तर केला आहेच. शिवाय ‘इट का जवाब पत्थर से’ देण्याची भावनादेखील व्यक्त केली आहे. विविध राजकीय, सामाजिक संघटनांनीदेखील या घटनेबाबत दु:ख व्यक्त करत कडक कारवाईची मागणी केली.संघ परिवारातर्फे निदर्शनेसंविधान चौकात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, राष्ट्रसेविका समितीच्या कार्यकर्त्यांनी पाकविरोधात निदर्शने केली. दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना याप्रसंगी मेणबत्ती लावून तसेच दोन मिनिटे मौन पाळून आदरांजली अर्पण करण्यात आली. डॉ. दिलीप गुप्ता, राष्ट्रीय शीख संगतचे रजवंतपालसिंग तुली, विश्व हिंदू परिषदेचे प्रांतमंत्री अजय निलदावार, संघाचे महानगर सहसंघचालक श्रीधरराव गाडगे, कार्यवाह अरविंद कुकडे, सहकार्यवाह रवींद्र बोकारे, महानगर प्रचारक क्षितीज गुप्ता, विदर्भ प्रांत प्रचार प्रमुख अनिल सांबरे, महानगर सहप्रचारप्रमुख ब्रजेश मानस, शंकरराव वानखेडे, अविनाश आवळे, बाबुराव देशकर, सुनील किटकरू, श्याम पत्थरकिने, संजय सराफ, लीना गहाणे, बजरंगी पुंज इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.भाजपा आमदारांचा आक्रमक पवित्राभारतीय जनता पक्षातर्फे सायंकाळी संविधान चौकात शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी भाजपाचे खासदार विकास महात्मे, शहराध्यक्ष आ.सुधाकर कोहळे, आ.अनिल सोले, आ. विकास कुंभारे, आ.मिलिंद माने, महापौर नंदा जिचकार, उपमहापौर दीपराज पार्डीकर, सत्ता पक्षनेते संदीप जोशी, स्थायी समिती अध्यक्ष विक्की कुकरेजा, भाजपा नेते दयाशंकर तिवारी, माजी महापौर प्रवीण दटके, डॉ. उपेंद्र कोठेकर, भोजराज डुंबे, श्रीकांत देशपांडे, धर्मपाल मेश्राम, देवेन दस्तुरे, चंदन गोस्वामी, राजू वाघ, भक्ती आमटे, गौरी पौनीकर प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी संतप्त आमदार व कार्यकर्त्यांनी पाकिस्तानचा झेंडा जाळला. तसेच मेणबत्त्या लावून शहिदांना आदरांजली वाहण्यात आली. जे जवान काश्मीरच्या जनतेच्या हितासाठी संकटात धावून गेले, त्यांच्यावर हल्ला करणे भ्याडपणाचेच लक्षण आहे. पाकिस्तानला त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर दिले पाहिजे, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली.देवडिया कॉंग्रेस भवनात श्रद्धांजलीशहर कॉंग्रेस अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या उपस्थितीत देवडिया कॉंग्रेस भवन येथे आयोजित सभेत शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. दहशतवादी तत्त्वांवर नियंत्रण मिळविले पाहिजे, अशी भावना ठाकरे यांनी व्यक्त केली. यावेळी माजी केंद्रीय राज्यमंत्री विलास मुत्तेमवार, अतुल लोंढे, अतुल कोटेचा, अभिजीत वंजारी, शेख हुसैन, संजय सरायकर, प्रशांत धवड़, संदेश सिंगलकर, विवेक निकोसे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी अब्दुल शकील, अशोक निखाड़े, रश्मी उईके, उज्ज्वला बनकर, पंकज लोणारे, प्रशांत कापसे, जयंता दियेवार, दिनेश तराले, दिलीप खैरवार, स्नेहल दहीकर, अरविंद वानखेड़े, पंकज थोरात, धरम पाटील, निखिल धांदे, नितीन देशमुख, योगेश देवतले, पंकज निघोट, आकाश तायवाड़े, रजत देशमुख, रिजवान रुमवी, रमन ठवकर, जगदीश गमे, मोतीराम मोहाडीकर, महेश श्रीवास, साबिर खान, यशवंत तुलशीकर, विश्वेश्वर अहीरकर, अनिता ठेगरे, विजय इंगोले, प्रशांत धाकने, आशिष नेवले, सुरेंद्र राय, राकेश गुप्ता, ईरफान काझी, रेहाना खान इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.शिवसेनेने जाळला पाकिस्तानचा झेंडाहल्ल्याचा विरोध करत शिवसेनेतर्फे वाठोडा चौकात निदर्शने करण्यात आली. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व माजी खासदार प्रकाश जाधव यांच्या नेतृत्वात निदर्शने झाली. यावेळी पाकिस्तानचा झेंडा जाळण्यात आला. तसेच घोषणाबाजीदेखील करण्यात आली. यावेळी पक्षाचे शहर प्रमुख राजेश तुमसरे, उपजिल्हा प्रमुख रविनीश पांडे, विधानसभा संघटक यशवंत रहांगडाले, मुन्ना तिवारी, योगेश न्यायखोर, मोहन गुरुपंच, अरविंद सिंह राजपूत, समित कपाटे, छगन सोनवणे,यश जैन, नीलेश सतीबावने, रोशन निर्मलकर, द्वारका शाहू, संजय राऊत, देवेंद्र माहुरकर, मधुसूदन सोनी, राजेश सरोदे इत्यादी उपस्थित होते.दुसरीकडे शिवसेनेच्या दक्षिण नागपूर भागातर्फेदेखील निदर्शने करण्यात आली. दक्षिण नागपूर विधानसभा संघटक राजू कनोजिया, महेश महाडिक, शंकर बेलखोड़े, पुरुषोत्तम बन, विशाल कोरके, जीतू गभने, सुरेश कदम, रुपेश बुराडे, सचिन काले इत्यादी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.महावितरणतर्फे श्रद्धांजलीदहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना महावितरण कार्यालयात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. काटोल मार्ग येथील कार्यालयात आयोजित कार्यक्रमात मुख्य अभियंता सुहास रंगारी, प्रभारी मुख्य अभियंता राकेश जनबंधू, महाव्यस्थापक शरद दाहेदार, उप महाव्यस्थापक प्रमोद खुले, कार्यकारी अभियंता प्रमोद धनविजय, प्रज्वला किरनाके, दीपाली माडेलवर, वैभव थोरात, प्रवीण काटोल, मधुसूदन मराठे उपस्थित होते.शहर काँग्रेस अल्पसंख्याक विभागनागपूर शहर कॉंग्रेस कमेटीच्या अल्पसंख्याक विभागातर्फे व्हेरायटी चौकात पाकिस्तान तसेच दहशतवाद्यांविरोधात नारेबाजी करण्यात आली. यावेळी पाकिस्तान मुर्दाबादचे नारे लावण्यात आले. शहर अध्यक्ष इरशाद अली, मोहम्मद समीर, किरण परवार, साधना मार्शल, शाहिदा बेगम, रूबी पठान, विद्या खरालकर, शहबाज खान, ज्ञानेश्वर ठाकरे, मो.रियाज, मुरसलीन कुरैशी, जावेद पटेल, वसीम खान, अनवर हुसैन, शेख हसन, मुख्तार शेख, शाहनवाज अख्तर, तौफीक कुरैशी, निसार शेख, इम्तियाज अहमद, शेख कादिर, कलीम अंसारी, हाफिज खान, अहमद खान, जुनैद अहमद इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.युवक काँग्रेसने जाळला इम्रान खानचा पुतळानागपूर शहर युवक काँग्रेसतर्फे अवस्थी चौक येथे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा पुतळा जाळण्यात आला. पाकिस्तानला त्याच्याच भाषेत प्रत्युत्तर द्यायला हवे ,अशी मागणी यावेळी करण्यात आली. अखिल भारतीय युवा काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव बंटी शेळके, शहर अध्यक्ष तौसिफ खान, फजलू रहमान कुरैशी, आकाश गुजर, नावेद शेख, अजहर शेख, शाहिद खान, बाबू खान, अनमोल लोणारे,प्रशांत धोटे, राकेश निकोसे इत्यादी उपस्थित होते.शहर महिला काँग्रेसतर्फे शांती मार्चशहर महिला कॉंग्रेसतर्फे बडकस चौक येथे शांती मार्च काढण्यात आला. यावेळी महिलांना शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली व पाकिस्तानविरोधात नारे लवले. यावेळी शहर अध्यक्ष प्रज्ञा बडवाईक, अंजना मडावी, संगीता उपरीकर, शालिनी सरोदे, कविता घुबडे, रजनी राऊत, अर्चना सिडम, अलका जिबांकर, मंदा वैरागडे, शमशाद शेख, विजया हजारे, पूजा देशमुख, माया नांदूरकर, प्रमिला धामणे, सिंधू चारभे,शोभा गौर, रेखा लांजेवार, आनंदी चारपे, चंद्रकांत चारपे, आशा शेंदरे, ज्योती होते, कविता बागेत, पायल सिंह उपस्थित होते.आम आदमी पक्षातर्फे नारेबाजीपुलवामा येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आम आदमी पक्षातर्फे नारेबाजी करण्यात आली. सरकारने त्वरित पाकिस्तानवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. गीता कुहीकर, सुनंदा खैरकर, सुभद्रा यादव, रजनी शुक्ला, नीलेश गोयल, शंकर इंगोले, लक्मीकांत दांडेकर, जगजीत सिंह, अशोक मिश्रा, देवेंद्र परिहार, किशोर चिमुरकारे , भूपाल सावरकर, अबरार खान, गोविंद भरद्वाज, अशोक पाटील, शशिकांत रायपुरे, राकेश दवे, विजय धकाते, अभिषेक, धीरज अगासे, रफी भाई, प्रभात अग्रवाल इत्यादी यावेळी उपस्थित होते.इतवारीत व्यापाऱ्यांनी काढला ‘कँडल मार्च’दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात युवा शक्ती दुर्गोत्सव मंडळातर्फे इतवारी येथील धारस्कर मार्ग येथे ‘कँडल मार्च’ काढण्यात आला. यावेळी कॉंग्रेसचे प्रदेश सचिव अतुल कोटेचा यांनी हा भारताच्या आत्म्यावर झालेला हल्ला असल्याचे म्हटले. यावेळी गड्डू टक्कामोरे, मुन्ना लखेटे, मनोज तिवारी, ओम गुप्ता, गजेंद्र पांडे, मंगल जैन, इरफान काजी, सोनू जैन, रूपेश जैन, पुरुषोत्तम कावडे, महेंद्र कटारिया, विपिन सारडा, जीतू धामा, लोकेश जैन, राहुल सिसोदिया, कैलाश कोठारी, राजू पालीवाल, रूपेश टक्कामोरे, अशोक लालवानी, रमेश गिडवानी, मदन उपगडे, हितेश जैन, अनुराग तिवारी, संजय टक्कामोरे, कमल रघोले, देवनंद चोरीवार, नितिन खापरे, सुनील टक्कामोरे, अबरार भाई उपस्थित होते.राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे निदर्शनेराष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष शैलेंद्र तिवारी यांच्या नेतृत्वात व्हेरायटी चौक येथे दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. यावेळी पाकिस्तानचा झेंडा जाळण्यात आला. यावेळी आ. प्रकाश गजभिये, नगरसेवक दुनेश्वर पेठे, ईश्वर बालबुधे, जानबा मस्के, अल्का कांबळे, जावेद हबीब, नूतन रेवतकर, चरणजीत चौधरी, महेंद्र भांगे, वाजिद शेख, रिजवान उपस्थित होते.