समाजकल्याणच्या शाळांची गुणवत्ता वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:25 AM2020-12-11T04:25:48+5:302020-12-11T04:25:48+5:30

मुख्याध्यापक-शिक्षकांना मिळणार विशेष प्रशिक्षण लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची ...

The quality of social welfare schools will increase | समाजकल्याणच्या शाळांची गुणवत्ता वाढणार

समाजकल्याणच्या शाळांची गुणवत्ता वाढणार

googlenewsNext

मुख्याध्यापक-शिक्षकांना मिळणार विशेष प्रशिक्षण

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची योजना समाजकल्याण विभागाने आखली आहे. टाटा ट्रस्ट व क्वेस्ट संघटनेच्या मदतीने समाजकल्‍याण विभागाच्या शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षकांना विशेष प्रशिक्षण देण्यात येत आहे.

समाजकल्याण विभागाकडून अनुसूचित जातीकरिता विविध योजना राबविल्या जातात. विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते. त्याचप्रमाणे विदेशात शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत देण्यात येते. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थांना सहकार्य असते. उच्च शिक्षणासोबत आता प्राथमिक शिक्षणही अधिक गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करण्यावर भर दिला जात आहे. या विद्यार्थ्यांना गणित, विज्ञान व मराठी विषयात अधिक पारंगत करण्याचा प्रयत्न आहे. यासाठी मुख्याध्यापक व शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. समाजकल्याण विभागाने यासाठी टाटा ट्रस्टशी करार केला. शिक्षण कशाप्रकारे द्यावे, कोणती काळजी घ्यावी, याबाबतचे प्रशिक्षण शिक्षकांना देण्यात येणार आहे. हे सर्व प्रशिक्षण ऑनलाईन देण्यात येणार आहे. समाजकल्याण विभागाच्या ९० शाळा असून, येथे जवळपास १३ हजार विद्यार्थी शिक्षण घेतात तर, २५०० वर आश्रमशाळा आहेत. पहिल्या टप्प्यात ९० शाळांमध्ये गुणवत्ता विकास कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

Web Title: The quality of social welfare schools will increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.