राहुल, प्रियांकाच्या अटकेवरून नागपुरात काँग्रेस भडकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2020 09:58 PM2020-10-01T21:58:44+5:302020-10-01T21:59:49+5:30

बलात्कार पीडित कुटुंबीयांची सांत्वना भेट घेण्यासाठी हाथरससाठी निघालेले काँग्रेस नेते राहुल गांधी अणि महासचिव प्रियांका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी रोखले व अटक केली. तसेच त्यांच्याशी असभ्य वर्तवणूक केली. या घटनेमुळे कॉँग्रेसचे कार्यकर्ते प्रचंड संतापले असून शहर काँग्रेसने याविरुद्ध गुरुवारी सायंकाळी निदर्शने करीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा पुतळा जाळला.

Rahul, Priyanka's arrest Congress sparked outrage in Nagpur | राहुल, प्रियांकाच्या अटकेवरून नागपुरात काँग्रेस भडकली

राहुल, प्रियांकाच्या अटकेवरून नागपुरात काँग्रेस भडकली

Next
ठळक मुद्दे ठिकठिकाणी आंदोलन : योगी आदित्यनाथांचा पुतळा जाळला

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बलात्कार पीडित कुटुंबीयांची सांत्वना भेट घेण्यासाठी हाथरससाठी निघालेले काँग्रेस नेते राहुल गांधी अणि महासचिव प्रियांका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी रोखले व अटक केली. तसेच त्यांच्याशी असभ्य वर्तवणूक केली. या घटनेमुळे कॉँग्रेसचे कार्यकर्ते प्रचंड संतापले असून शहर काँग्रेसने याविरुद्ध गुरुवारी सायंकाळी निदर्शने करीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा पुतळा जाळला.
अटक झाल्याची माहिती होताच काँग्रेस कार्यकर्ते देवडिया काँग्रेस भवनासमोर एकत्र आले. त्यांनी शहर काँग्रेसचे महासचिव डॉ. गजानन हटेवार व अभिजित वंजारी यांच्या नेतृत्वात निदर्शने केली. यावेळी किशोर गजभिये, इरशाद अली, दिनेश बानाबाकोडे, राजेश पौनीकर, राजेश ढेगे, वसीम खान, अ‍ॅड. अभय रणदिवे, सुरेंद्र राय, जावेद खान, लंकेश उके, बादल वाहने, राज खत्री, टिंकू कांबले, अनमोल लोणारे आदी उपस्थित हाते.

भाजप कार्यालयासमोर निदर्शने
युवक कॉग्रेसने भाजपच्या गणेशपेठ स्थित कार्यालयासमोर शहर अध्यक्ष तौसिफ खान यांच्या नेतृत्वात आंदोलन केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा पुतळा जाळला. आंदोलनात युवक कांग्रेसचे प्रदेश सचिव वसीम शेख व सागर चव्हाण, ग्रामीण अध्यक्ष राहुल सीरिया, इरफान काजी, अक्षय घाटोळे, आकाश गुजर, तौसिफ अहमद, इमरान शेख, सरफराज खान, बाबू खान, रोहन कुलकर्णी, शुभम ताल्हार, शोएब अन्सारी, राहुल मोहोड उपस्थित होते.

उत्तर नागपुरातही आंदोलन
युवक काँग्रेसने उत्तर नागपुरातील कमाल चौकातही आंदोलन केले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा पुतळा जाळला. आंदोलनात प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष कुणाल राऊत, महासचिव अजित सिंह, सचिव आसिफ शेख, सद खान, धीरज पांडे, विजया हजारे, सतीश पाली, गौतम अंबादे, सचिन वासनिक, राम यादव, अलीम बफाती, सलीम मस्ताना, पंकज सावरकर, पलाश लिंगायत, आकाश इंदुरकर आदी उपस्थित होते.

Web Title: Rahul, Priyanka's arrest Congress sparked outrage in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.