नागपुरातील जरीपटक्यातील एका कुंटणखान्यावर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 12:35 AM2018-10-03T00:35:37+5:302018-10-03T00:36:12+5:30
गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने जरीपटक्यातील एका कुंटणखान्यावर छापा मारून वेश्याव्यवसाय करवून घेणाऱ्या एका दाम्पत्याला अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने जरीपटक्यातील एका कुंटणखान्यावर छापा मारून वेश्याव्यवसाय करवून घेणाऱ्या एका दाम्पत्याला अटक केली. नम्रता (वय ४०) आणि नरेश धोंडबाजी बावणे (वय ४०) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपी दाम्पत्याची नावे आहेत.
जरीपटक्यातील आहुजानगरात विजय वाघमारे यांच्याकडे बावणे दाम्पत्य भाड्याने राहत होते. महिला-मुलींना पैशाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून ते तेथे वेश्याव्यवसाय करवून घेत होते. ही माहिती कळाल्यानंतर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा पथकाने कारवाईसाठी सापळा लावला. बनावट ग्राहक पाठवून बावणे दाम्पत्याकडे वेश्याव्यवसायाबाबत विचारणा करण्यात आली. त्यांनी पैसे घेऊन ग्राहकाला देहविक्रय करणारी एक मुलगी उपलब्ध करून दिली. काही वेळेनंतर सामाजिक सुरक्षा पथकातील पोलीस निरीक्षक विक्रम गौड, सहायक निरीक्षक संजीवनी थोरात, उपनिरीक्षक स्मिता सोनवणे, फौजदार दामोधर राजुरकर, हवलदार शितलाप्रसाद मिश्रा, मुकुंदा गारमोडे,सुभाष खेडकर, संजय पांडे, मनोज चव्हाण, शिपायी प्रल्हाद डोळे, सुरेखा सांडेकर, छाया राउत, साधना चव्हाण चालक अनिल दुबे, बळीराम रेवतकर तसेच सामाजिक कार्यकर्त्या नूतन रेवतकर आणि राणी कळमकर यांनी तेथे छापा घातला. यावेळी देहविक्रय करणारी मुलगी ताब्यात घेऊन चौकशीनंतर तिला सोडून देण्यात आले. तर, आरोपी नम्रता आणि तिचा पती नरेश बावणे या दोघांना अटक करण्यात आली.