लाेकमत न्यूज नेटवर्क
केळवद : येथील पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील छत्रापूर (ता. सावनेर) शिवारातील तलावाच्या काठालगत सुरू असलेल्या माेहफुलाच्या दारूभट्टीवर पाेलिसांनी धाड टाकून चार महिलांसह तीन आराेपींना अटक केली. त्यांच्याकडून माेहफुलाची दारू, रसायन सडवा व इतर साहित्य असा एकूण ४ लाख १२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई बुधवारी (दि. २१) सकाळी ८.३०च्या सुमारास करण्यात आली.
आराेपी मुकेश दुर्गेशसिंह मारवाडी (३४), तारासिंह भाऊराव पवार (५५), रतनसिंह रमेश राजपूत (३६) (सर्व रा. छत्रापूर खदान, ता. सावनेर) यांच्यासह चार महिला आराेपींना अटक केली आहे तर आराेपी जगदीश रामा अलघरे हा पळून गेला आहे.
छत्रापूर शिवारातील तलाव काठालगत माेहफुलाची दारूभट्टी सुरू असून, गावठी दारूची माेठ्या प्रमाणात विक्री केली जात असल्याची माहिती केळवद पाेलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पाेलिसांनी दारूभट्टीवर धाड टाकून आराेपींना रंगेहात अटक केली. या कारवाईत चार हजार लीटर माेहफूल रसायन सडवा, ३०० लीटर माेहफुलाची दारू व इतर साहित्य असा एकूण ४ लाख १२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती ठाणेदार दिलीप ठाकूर यांनी दिली. याप्रकरणी केळवद पाेलीस ठाण्यात गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई ठाणेदार दिलीप ठाकूर, पाेलीस उपनिरीक्षक अर्जुन राठाेड, अमरदीप कामठे, देवा देवकते, सचिन येलकर, श्रीधर कुलकर्णी, गुणवंता डाखाेळे, प्रगती नारनवरे, पाैर्णिमा साेनेकर यांच्या पथकाने केली.