लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक/हिवराबाजार : देवलापार (ता. रामटेक) पाेलिसांनी महाराष्ट्र व मध्य प्रदेशाच्या सीमेवर असलेल्या, तसेच नागपूूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील मानेगाव टेक (ता. रामटेक) येथील जुगार अड्ड्यावर धाड टाकली. यात १७ जुगाऱ्यांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून एकूण २५ लाख ३४ हजार ८६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शनिवारी (दि. २०) मध्यरात्री ३ वाजताच्या सुमारास करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या आराेपींमध्ये विजय बिदप्रसाद गुप्ता (३५), मिलिंद रमेश जयस्वाल (३७), नितेश राजेंद्रप्रसाद गुप्ता (४१) सर्व रा. देवलापार, ता. रामटेक, सलीम बशीर खान (२६), तुषार जयदेव शेंडे (१९) दाेघेही रा.मनसर, ता.रामटेक, राहुल राजेंद्रप्रसाद जयस्वाल (३०, रा.पवनी, ता. रामटेक), गोविंद रमेश ब्रह्मे (३०), मनोज बाबुलाल जावरे (२८), प्रमोद जगदीश प्रसाद त्रिवेदी (३९), ओमप्रकाश श्रीराम भांगरे (४०), मोहम्मद फिरोज नूर (३५), शुभम संजय बघेल (२७) सर्व रा.शिवनी, मध्य प्रदेश, अतुल अंबालाल उईके (२५, रा.सावरी, ता.तिरोडी जिल्हा बालाघाट, मध्य प्रदेश, बुनेश चंदनलाल लिल्हारे (५४, रा. कटंगी, जिल्हा बालाघाट, मध्य प्रदेश), सुनील हेमंत चौकसे (३५, रा.तिरोडी, जिल्हा बालाघाट, मध्य प्रदेश), ईशाद खान मोहम्मद नजीर खान (२८, रा. खवासा, ता.कुरई, जिल्हा शिवनी, मध्य प्रदेश) यांचा समावेश आहे.
देवलापार पाेलिसांचे पथक गस्तीवर असताना, त्यांना मानेगाव टेक परिसरात जुगार खेळला जात असल्याची माहिती मिळताच, पाेलिसांनी पाहणी करून धाड टाकली. यात जुगार खेळणाऱ्यांवर १७ जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून १ लाख ६७ हजार २६० रुपये राेख, १ लाख २७ हजार रुपये किमतीचे २१ माेबाइल, २२ लाख ४० हजार रुपये किमतीची चार चारचाकी व दाेन दुचाकी वाहने, तसेच जुुगार खेळण्याचे साहित्य असा एकूण २५ लाख ३४ हजार ८६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती ठाणेदार प्रवीण बाेरकुटे यांनी दिली. या प्रकरणी देवलापार पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक दत्तप्रसाद शेंडगे, उपनिरीक्षक केशव पुंजरवाड, गोविंद खांडेकर राजू पोले, शिवाजी दिंडे, अतुल बांते, रूपेश शेंदरे, संदीप सहारे, जितेंद्र हलमारे यांच्या पथकाने केली.