लाेकमत न्यूज नेटवर्क
सावनेर/खापरखेडा : वाकाेडी (ता. सावनेर) शिवारातून चाेरीला गेलेला राेड राेलर खापा पाेलिसांनी जप्त करून पाेलीस ठाण्याच्या आवारात जमा केला. मात्र, आराेपीने हा राेलर उचलण्यासाठी वापरलेला हायड्रा व वाहून नेण्यासाठी वापरलेला ट्रक अद्याप पाेलिसांनी जप्त केला नाही. या राेलर चाेरी प्रकरणात पाेलिसांनी माजी जिल्हा परिषद सदस्याच्या मुलाला अटक केली हाेती. त्याची जामिनावर सुटका करण्यात आली.
पंकज अशाेक तांदूळकर (३०, रा. वलनी, ता. सावनेर) असे आराेपीचे नाव आहे. पंकज हा माजी जिल्हा परिषद सदस्य अशाेक तांदूळकर यांचा मुलगा असून, त्याने लक्ष्मण पावडे, रा. भानेगाव, ता. सावनेर यांच्या मालकीचा नादुरुस्त राेड राेलर वाकाेडी शिवारातून चाेरून नेला हाेता. हा राेलर बुधवारी (दि. ८) दुपारी चाेरीला गेला असून, खापा (ता. सावनेर) पाेलिसांनी गुरुवारी (दि. ९) गुन्हा नाेंदविला व शनिवारी (दि. ११) पंकजला अटक केली.
सावनेर येथील प्रथम श्रेणी न्यायालयाने आराेपी पंकजला काही अटींवर जामीन मंजूर केल्याने त्याची सुटका करण्यात आली. हा राेलर नागपूर शहराजवळील बीडगाव टी पाॅइंटजवळून जप्त करून खापा पाेलीस ठाण्याच्या आवारात जमा केला. त्याची किंमत २ लाख ५० हजार रुपये असल्याची माहिती ठाणेदार अजय मानकर यांनी दिली.
...
प्रमाणपत्राच्या आधारे जामीन
पंकजला अटक केल्यानंतर पाेलिसांनी त्याची खापा येथील शासकीय दवाखान्यात वैद्यकीय तपासणी केली. पंकजला आजार असल्याचे या प्रमाणपत्रात नमूद केले आहे. या प्रमाणपत्राच्या आधारे न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला. या प्रकरणात खापा पाेलिसांनी पंकजने राेलर उचलण्यासाठी वापरलेला हायड्रा व वाहतुकीसाठी वापरलेला ट्रक जप्त केलेला नाही. पाेलिसांनी हायड्राचा मालक व दीड लाख रुपयात राेलर विकत घेणाऱ्या कबाडी व्यावसायिकाला साधी विचारपूसही केली नाही.