रेल्वेतील प्रवाशाचा मृत्यू

By Admin | Published: November 1, 2015 03:24 AM2015-11-01T03:24:49+5:302015-11-01T03:24:49+5:30

सुरक्षा आणि वैद्यकीय सुविधा पुरविण्यासाठी रेल्वे प्रशासनाने १८२ हा हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून दिला आहे.

Railway passenger death | रेल्वेतील प्रवाशाचा मृत्यू

रेल्वेतील प्रवाशाचा मृत्यू

googlenewsNext

तामिळनाडू एक्स्प्रेस ‘लेट’ : वेळीच उपचार मिळाला नाही
नागपूर : सुरक्षा आणि वैद्यकीय सुविधा पुरविण्यासाठी रेल्वे प्रशासनाने १८२ हा हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. परंतु एखादा प्रवासी एकटाच प्रवास करीत असेल आणि त्याची प्रकृती बिघडल्यास त्याच्यावर लक्ष पुरविण्यात येत नाही. त्यामुळे शनिवारी एका प्रवाशाचा वेळीच उपचार न मिळाल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली.
१२६२२ तामिळनाडू एक्स्प्रेसने (कोच एस-१) एक प्रवासी प्रवास करीत होता. तो बराच वेळापासून बेशुद्धावस्थेत पडून होता. परंतु तो काहीच हालचाल करीत नसल्यामुळे सहप्रवाशांना बऱ्याच वेळानंतर शंका आली. त्यांनी गाडीतील टीटीईला याबाबत सूचना दिली. त्यानंतर टीसीने नागपूर रेल्वेस्थानकावर गाडी येण्यापूर्वी उपस्टेशन व्यवस्थापकांना कळविले. उपस्टेशन व्यवस्थापकांनी लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे डॉक्टरांना पाचारण केले. तामिळनाडू एक्स्प्रेस दुपारी ३ वाजता नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक १ वर आली. त्यानंतर रेल्वेच्या डॉक्टरांनी या प्रवाशाला तपासून मृत घोषित केले. लोहमार्ग पोलिसांनी या प्रवाशाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मेयो रुग्णालयात पाठविला. संबंधित प्रवाशाला वेळीच उपचार मिळाले असते तर त्याचा जीव वाचला असता. परंतु त्याच्यासोबत त्याचे कुटुंबीय प्रवास करीत नसल्यामुळे हेल्पलाईनवर कोणीच संपर्क साधला नाही. त्यामुळे असा एकटा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठीही रेल्वे प्रशासनाने उपाययोजना करण्याची गरज आहे. संबंधित प्रवाशाची ओळख पटू शकली नाही. या घटनेमुळे तामिळनाडू एक्स्प्रेसला २० मिनिटे विलंब झाला. (प्रतिनिधी)

Web Title: Railway passenger death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.