लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नववर्षाच्या पहिल्याच दिवसापासून रेल्वे मंत्रालयाने प्रवासभाड्यात वाढ लागू केली आहे. प्रवासभाडे वाढल्यामुळे प्रवाशांना १ ते ४ पैसे अधिक मोजावे लागणार असल्यामुळे त्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे.रेल्वेने २०१४-१५ नंतर पहिल्यांदाच प्रवासभाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांमध्ये नॉन एसी कोचमधून प्रवासासाठी प्रति किलोमिटर २ पैसे, एसी कोचमधून प्रवासासाठी प्रति किलोमिटर ४ पैसे अधिक मोजावे लागणार आहेत. १ जानेवारी आणि त्यानंतर तिकीट खरेदी करणाऱ्या प्रवाशांना नव्या दरानुसार तिकीट खरेदी करावे लागणार आहे. परंतु १ जानेवारीपूर्वी तिकीट खरेदी केलेल्या प्रवाशांकडून अतिरिक्त रक्कम वसूल करण्यात येणार नाही. मागील चार वर्षात रेल्वेने पहिल्यांदाच तिकीट दरात वाढ केली आहे. रेल्वेने देशभरात रेल्वेस्थानकांवर प्रवाशांना विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मोफत वाय फाय, एस्केलेटर, एसी वेटिंग रुम, पॅसेंजर लाऊंज, आधुनिक एलएचबी कोच या सुविधांचा समावेश आहे. सातव्या वेतन आयोग कर्मचाऱ्यांना लागू केल्यामुळे रेल्वेवर अतिरिक्त भार पडला आहे. त्यामुळे प्रवासभाड्यात वाढ करणे गरजेचे असल्याचे रेल्वे मंत्रालयाने म्हटले आहे. ते काही असो परंतु नव्या वर्षात मात्र प्रवाशांना या वाढलेल्या प्रवासभाड्याचा भार सोसावा लागणार आहे, हे निश्चित.आधी तिकीट खरेदी करणाऱ्यांना नाही भुर्दंडरेल्वेने १ जानेवारीपासून प्रवाशांना प्रवासभाड्यात वाढ केलेली आहे. त्यामुळे आधी तिकीट खरेदी करणाऱ्यांमध्ये रेल्वेकडून अतिरिक्त पैसे वसूल करण्याची भीती वाटत आहे. परंतु १ जानेवारीपूर्वी तिकीट खरेदी करणाऱ्यांकडून कोणतेही शुल्क वसूल करण्यात येणार नसल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आधी तिकीट करणाऱ्यांना कोणतेही अतिरिक्त शुल्क देण्याची गरज नाही.तिकीट दरवाढ चुकीचीनव्या वर्षात शासनाने प्रवाशांना शुभेच्छा द्यावयास हव्या. परंतु प्रवाशांवर तिकीट दरवाढीमुळे अतिरिक्त बोजा पडणार आहे. रेल्वे बजेट पुढील महिन्यात आहे. तेव्हा प्रवासभाडे वाढवायचे सोडून मध्यंतरीच प्रवासभाडे वाढविणे चुकीचे आहे. प्रवाशांना रेल्वेकडून सुविधा मिळत नाहीत. सुविधा देण्याचे सोडून त्यांच्यावर तिकीट दरवाढ लादण्याची गरज नव्हती.’राष्ट्रीय महासचिव, अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषद
तिकीट दरवाढीमुळे रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2020 11:46 PM
नववर्षाच्या पहिल्याच दिवसापासून रेल्वे मंत्रालयाने प्रवासभाड्यात वाढ लागू केली आहे. प्रवासभाडे वाढल्यामुळे प्रवाशांना १ ते ४ पैसे अधिक मोजावे लागणार असल्यामुळे त्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे.
ठळक मुद्देअधिक पैसे मोजावे लागणार : तिकीट १ ते ४ पैशांनी महागले