मेगा ब्लॉकमुळे रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 01:12 AM2018-09-13T01:12:32+5:302018-09-13T01:13:37+5:30

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील कळमना-गोंदिया-दुर्ग आणि दुर्ग-रायपूर-बिलासपूर या सेक्शन दरम्यान रेल्वे रुळाच्या देखभालीचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी या दोन्ही सेक्शनमध्ये १६ ते २३ सप्टेंबर २०१८ दरम्यान मेगा ब्लॉक घेण्यात येत असून त्यामुळे २३ सप्टेंबरपर्यंत रेल्वेगाड्या विस्कळीत राहणार आहेत.

Railway schedules disrupted due to mega block | मेगा ब्लॉकमुळे रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत

मेगा ब्लॉकमुळे रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत

googlenewsNext
ठळक मुद्देसात गाड्यांवर परिणाम : कळमना- गोंदिया सेक्शन दरम्यान रेल्वे रुळाचे काम

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्यानागपूर विभागातील कळमना-गोंदिया-दुर्ग आणि दुर्ग-रायपूर-बिलासपूर या सेक्शन दरम्यान रेल्वे रुळाच्या देखभालीचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी या दोन्ही सेक्शनमध्ये १६ ते २३ सप्टेंबर २०१८ दरम्यान मेगा ब्लॉक घेण्यात येत असून त्यामुळे २३ सप्टेंबरपर्यंत रेल्वेगाड्या विस्कळीत राहणार आहेत.
रेल्वे रुळावर सतत रेल्वेगाड्या धावत असल्यामुळे रेल्वे रुळाची देखभाल करण्यासाठी रेल्वे प्रशासनाला फारसा वेळ मिळत नाही. परंतु सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रेल्वे रुळाची देखभाल करणे ही महत्त्वाची बाब आहे. त्यामुळे दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील कळमना-गोंदिया-दुर्ग आणि दुर्ग-रायपूर-बिलासपूर या सेक्शन दरम्यान रेल्वे रुळाच्या देखभालीचे काम करण्याचा निर्णय दक्षिण पूर्व मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार १६ ते २३ सप्टेंबर दरम्यान या दोन्ही सेक्शनमध्ये रेल्वे रुळाच्या देखभालीचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी ६८७२७ बिलासपूर-रायपूर मेमु, ६८७२९ रायपूर-डोंगरगड मेमु व ६८७३० डोंगरगड-रायपूर मेमु १६ आणि २३ सप्टेंबरला रद्द राहणार आहे. ५८१११ टाटानगर-इतवारी पॅसेंजर टाटानगर स्थानकावरून १६ आणि २३ सप्टेंबरला चार तास विलंबाने सुटेल. ६८७२५ रायपूर-दुर्ग मेमु रायपूर स्थानकावरून १६ आणि २३ सप्टेंबरला पाच तास उशिराने सुटेल. १८२३९ शिवनाथ एक्स्प्रेस १६ आणि २३ सप्टेंबरला बिलासपूरवरून तीन तास उशिराने सुटेल. तर १२८५६ इंटरसिटी इतवारी रेल्वेस्थानकावरून १७ आणि २४ सप्टेंबरला दोन तास उशिराने सुटणार आहे. रेल्वे प्रवाशांनी या बदलाची नोंद घेऊन आपला प्रवास निश्चित करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Web Title: Railway schedules disrupted due to mega block

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.