लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मध्य रेल्वेच्यानागपूर विभागात नागपूर ते इटारसी मार्गावर गोधनीच्या आधी एका मालगाडीचा वॅगन पाईप तुटल्यामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. यामुळे तीन रेल्वेगाड्यांना जवळपास एक तास रेल्वेस्थानकावर रोखून धरण्यात आले.मालगाडीचा वॅगन पाईप तुटल्यामुळे नागपूरकडे येणाऱ्या रेल्वेगाड्यांना विलंब झाला. मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी ४.३० वाजता नागपूरकडून इटारसीकडे जाणाऱ्या एका मालगाडीचा वॅगन पाईप तुटला. मालगाडी रुळावरून घसरू नये, यासाठी लोकोपायलटने त्वरित मालगाडी थांबविली. याबाबत लोकोपायलटने त्वरित नियंत्रण कक्षाला सूचना दिली. अभियांत्रिकी विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्वरित दुरुस्तीचे काम हाती घेतले. प्रवासी रेल्वेगाड्यांसाठी मार्ग त्वरित मोकळा करणे गरजेचे असल्यामुळे, दुसऱ्या इंजिनच्या मदतीने मालगाडीला गोधनी येथे नेण्यात आले. त्यासाठी एक तासाचा कालावधी लागल्यामुळे या मार्गावरील रेल्वेगाड्यांना विलंब झाला.अहिल्यानगरी, संपर्कक्रांती एक्स्प्रेसला उशीरमालगाडीचा वॅगन पाईप तुटल्यामुळे मेन लाईनवरील वाहतूक ठप्प झाली. काही गाड्यांना नागपूर रेल्वेस्थानकावर थांबविण्यात आले, तर काही गाड्यांना गोधनी, अजनी रेल्वेस्थानकावर रोखण्यात आले. यामुळे १२५२२ एर्नाकुलम-बरौनी अहिल्यानगरी एक्स्प्रेस, १२६४९ यशवंतपूर-हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेसला प्लॅटफार्म क्रमांक १ आणि २ वर एक तास थांबविण्यात आले. रेल्वेगाडी क्रमांक २२१३५ नागपूर-अमृतसर एक्स्प्रेसला प्लॅटफार्म क्रमांक ६ वर थांबवून ३५ मिनिटानंतर रवाना करण्यात आले. १२७२२ हजरत निजामुद्दीन-हैदराबाद दक्षिण एक्स्प्रेसला गोधनी येथे थांबविण्यात आले. ही गाडी नागपुरात ५० मिनिटे उशिरा पोहोचली. १२२९६ दानापूर-बेंगळुरू एक्स्प्रेस ४८ मिनिटे आणि २२३५१ पाटलीपुत्र- यशवंतपूर एक्स्प्रेस २७ मिनिटे उशिरा पोहोचली.
मालगाडीचा वॅगन पाईप तुटल्यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 12:56 AM
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात नागपूर ते इटारसी मार्गावर गोधनीच्या आधी एका मालगाडीचा वॅगन पाईप तुटल्यामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली.
ठळक मुद्देनागपूर-इटारसी मार्गावर अडकल्या रेल्वेगाड्या