उपराजधानीत पाऊस अन गारवा; वातावरणात अचानक बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2019 09:34 PM2019-12-15T21:34:49+5:302019-12-15T21:35:14+5:30
हवामान विभागाच्या अंदाजनुसार दक्षिण-पश्चिम उत्तर प्रदेश,बिहार व आसाम येथे निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे उपराजधानीतील हवामानात अचानक बदल झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीत रविवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारी ३.४५ च्या सुमारास जोराच्या वाऱ्यासोबतच पावसाच्या सरी आल्या. सुमारे अर्धातास शहरातील काही भागात जोराचा पाऊ स तर काही भागात तुरळक पाऊ स पडला. त्यानंतर गारठा वाढल्याने थंड हवा सुटली. रात्री उशिरापर्यंत वारे वाहत होते.
हवामान विभागाच्या अंदाजनुसार दक्षिण-पश्चिम उत्तर प्रदेश,बिहार व आसाम येथे निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे उपराजधानीतील हवामानात अचानक बदल झाला आहे. मात्र किमान तापमान अजूनही सरासरीच्या तुलनेत चार अंशाने अधिक १६.८ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.
दिवसाचे तापमान सरासरीच्या तुलनेत एक अंशाने अधिक ३०.२ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. शहरात सकाळी ८.३० वाजता आर्द्रता ८९ टक्के तर सायंकाळी ५.३० वाजता ८७ टक्के होती.
सायंकाळी अचानक पाऊ स आल्याने हवामानात बदल झाला आहे. थंड वाऱ्यांचा वेग वाढला आहे. यामुळे वातावणात थोडा गारठा जाणवू लागला आहे. पुढील काही दिवसात तापमानात घट होण्याची शक्यता आहे.