नागपूर : कामगार नेता तसेच इंटकचे माजी पदाधिकारी राजेंद्र हरडे यांचे बुधवारी अल्प आजाराने निधन झाले. सीएमपीडीआयएल कार्यालयात सेवारत हरडे यांचे अनेक कामगार आंदाेलनात याेगदान हाेते.
अशाेक रावळे ()
सेवानिवृत्त वायुसेना अधिकारी अशाेक रावळे (७८, रा. धरमपेठ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी व दाेन मुले आहेत.
दादाजी आंबटकर ()
दादाजी रामाजी आंबटकर (रा. मनीषनगर) यांचे निधन झाले. साेनेगाव घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
नीलिमा आष्टणकर ()
नीलिमा ईश्वर आष्टणकर (६८, रा. पांडे ले-आऊट, खामला राेड) यांचे निधन झाले. सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
रुखमाबाई चरडे ()
रुखमाबाई आनंदराव चरडे-महाजन (८८, रा. काटाेल) यांचे निधन झाले. स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगी व दोन मुले आहेत.
प्रकाश पैठणकर ()
प्रकाश गंगाधर पैठणकर (७५, रा. नवीन नरसाळा) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दाेन मुले व सुना आहेत.
सुधीर वासनिक ()
सुधीर वामनराव वासनिक (रा. मस्कासाथ, इतवारी) यांचे निधन झाले. शांतिनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
कृष्णराव गुडधे ()
कृष्णराव पंजाबराव गुडधे (८८, रा. अयाचित मंदिर, कुणबीपुरा) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार गंगाबाई घाटावर करण्यात आले. त्यांच्या पश्चात तीन मुले आहेत.
चंदूजी देशपांडे ()
श्री गजानन क्रीडा मंडळाचे संस्थापक चंदूजी देशपांडे (८९, रा. रुक्मिणीनगर) यांचे निधन झाले. दिघाेरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी व नातवंड आहेत.
राजू कुंडे ()
राजू नत्थूजी कुंडे (रा. काॅर्पाेरेशन काॅलनी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
किरण लांजेवार
किरण कृष्णराव लांजेवार (६०, रा. दुर्गानगर, मानेवाडा) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी आहे.
सुशीलाबाई धाेटकर
सुशीलाबाई नथ्थुसाव धोटकर (९१, रा. जागनाथ बुधवारी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पाच मुले व पाच मुली आहेत.